चाकण शहरातून धम्मप्रबोधन फेरी
चाकण शहरातून धम्मप्रबोधन फेरी
श्रामणेर दिक्षा घेतलेल्या नवोदीत भिक्कू संघाकडून तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या धम्माचे जनतेत प्रबोधन व्हावे म्हणून आज (दि. ३०) चाकण बौध्द विहारात पंचशिल त्रिशरण बौध्दवंदना घेऊन शहरातून धम्मप्रबोधन रॅली काढण्यात आली होती .
आंबेठाण (ता. खेड) मध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित श्रामणेर शिबीर चालू आहे . त्यातील शिबिरार्थींकडून चाकण शहरात धम्म प्रबोधन रॅली काढण्यात आली . भद्न्तांच्या च्या हातून श्रामणेर दिक्षा देऊन शिबिरार्थी बौध्द धम्मातील वंदना सुक्त संग्रह, परित्राण पाठ, अनापाणसती मेत्ता भाव,विपश्यना आदी ध्यान धारणेचा अभ्यास आंबेठाण येथे करीत आहेत. श्रामणेर शिबिरानिमित्त चाकण शहरातून धम्म प्रबोधन रॅली काढण्यात येऊन महामानव तथागत भगवान गौतम बुध्दांच्या धम्माचे प्रबोधन करण्यात आले. रॅलीला सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथून सुरुवात झाली. तत्पूर्वी भिमज्योत तरुण मंडळाच्या व रमाबाई महिला मंडळाच्या वतीने सर्व भिक्कुगणांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) , सिद्धार्थ (बाप्पू) गोतारणे, जिल्हा संघटक पी के. पवार, आर.डी.गायकवाड,विशाल गायकवाड, राजेंद्र भोसले, आर.डी. गायकवाड, राजेंद्र भोसले , निखिल नवरे, विजय भवार, किरण तुळवे , आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव, चाकण शहराध्यक्ष अशोक गोतारणे , चाकण राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शेखर घोगरे, शंकर नाईकनवरे, सतीश आगळे, राहुल गोतारणे, नितीन जगताप आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी खेड तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनता आवर्जून हजेरी लावत आहे. चाकण मध्ये सर्व नवोदीत भिक्कू संघाच्या भोजनाची व्यवस्था शेखर घोगरे यांनी केली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा