धारधार कुऱ्हाडीचे घाव घालून महिलेचा निर्घृण खून
धारधार कुऱ्हाडीचे घाव घालून महिलेचा निर्घृण खून
बेपत्ता पतीचे कपडे आढळले विहिरीजवळ ; एक चिट्ठीही आढळली
निघोज्यातील घटना
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा धारदार कुऱ्हाडीने वार करून खून करून खून केल्याची घटना आज (दि.३०) सकाळी साडेसहा वाजनेचे सुमारास निघोजे (ता.खेड ,जि.पुणे ) येथील रोहन अॅग्रो टेकच्या कामगार वसाहतीत घडली. धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत महिला मिळून आल्या नंतर पोलिसांनी तीच्या पतीचा शोध सुरु केला असता लगतच्या एका विहिरीजवळ त्याची चप्पल आणि पँन्ट मिळून आली असून .पोलिसांनी त्याच्या विहिरीजवळील कपड्याची झडती घेतली असता त्यात मोबाईल आणि केवळ 'रामराम' एवढाच मजकूर लिहलेली चिट्ठी मिळून आली आहे. त्यामुळे खुनाच्या या प्रकारानंतर त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून त्याने आत्महत्या केली कि, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी काही बनाव केला आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी आज सायंकाळी उशिरा विहिरीत मृतदेह मिळतो का याचा शोध सुरु केला आहे.
सविता बाबू वसुरकर उर्फ पांचाळ (वय ३२, सध्या रा. निघोजे,ता.खेड, मूळ रा. वांगी ता. माझलगाव जि.बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून बाबू सुभाष वसुरकर उर्फ पांचाळ (वय ३८, सध्या रा. निघोजे,ता.खेड, मूळ रा. वांगी ता. माझलगाव जि.बीड) असे पतीचे नाव आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक किशोर पाटील, संजय घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता कविताहिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना मिळून आला आहे. त्या नंतर पोलिसांनी तीच्या पतीचा शोध सुरु केला असता लगत असलेल्या एका विहिरीजवळ पती सुभाष वसुरकर याची चप्पल आणि पँन्ट मिळून आली. त्या कपड्याची झडती घेतली असता त्यात मोबाईल आणि केवळ 'रामराम' एवढाच मजकूर लिहलेली चिट्ठी मिळून आली आहे. पत्नीच्या खुनानंतर पती सुभाष याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याच्या संशयातून पोलिसांनी विहिरीत त्याचा मृतदेह मिळतो का ? याचा शोध सुरु केला आहे. घराजवळील कविता हिच्या मृतदेहाच्या घटनास्थळी पंचनामा करून कुऱ्हाड ताब्यात घेतली असून पोलिसांनी सायंकाळी हा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी आणला आहे. सायंकाळी संबंधित मृत सविता यांचे नातेवाईक आले असता पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्या नंतर पती सुभाष हा चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सविताला वारंवार त्रास देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.३०) सकाळी साडेसहा वाजनेचे सुमारास निघोजे (ता.खेड ,जि.पुणे ) येथील रोहन अॅग्रो टेकच्या कामगार वसाहतीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या पतीचा मृतदेह आज (दि.३१) सकाळी दहाच्या सुमारास म्हणजे घटनेनंतर तब्बल २४ तासांनी विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले असून पत्नीच्या खुनानंतर पतीनेही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
-------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा