जाळलेल्या आकाशच्या खुनाचे गूढ कायम ...

जाळलेल्या आकाशच्या खुनाचे गूढ कायम ...
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
दोन अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल
 Displaying aakash mahalungkar.jpg
  कोरेगाव येथील चिमुरड्या आकाश महाळुंगकर  खुनाचे गूढ उकलणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीदेखील तपासात पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही. विद्यार्थ्याला संपविण्याच्या उद्देशानेच पेटवून देण्यात आल्याचा नागरिकांचा आणि नातेवाईकांचा सूर असल्याचा पोलिसांचा दावा आहे.  दरम्यान आज (दि.५) सायंकाळी सव्वापाच वाजनेचे सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात आकाशवर कोरेगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
   प्रातविधी करण्यासाठी घराच्या पाठीमागील शेतात गेलेल्या आकाश संदीप महाळुंगकर (वय १३,रा. कोरेगाव खुर्द ,ता.खेड,जि.पुणे) या  चिमुरड्यास दोन अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना चाकण जवळ कोरेगाव खुर्द (ता.खेड,जि.पुणे) येथे रविवारी (दि.४) पहाटे दोन वाजनेचे सुमरास घडली होती . या गंभीर घटनेत शंभर टक्के होरपळलेल्या आकाशची पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात तब्बल १६ तास मृत्यूशी झुंज सुरु होती . मात्र रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत रविवारी सायंकाळी साडेसहा वाजनेचे सुमारास मालवली होती.
 या बाबतचे सविस्तर वृत्त असे किआकाश रविवारी (दि.४) पहाटे दोन वाजनेचे सुमारास कोरेगाव खुर्द येथे आपल्या राहत्या घराच्या अगदी बाजूलाच असलेल्या छोट्याशा टेकडीवर प्रातविधीसाठी गेला असता अंधारातून पाठीमागील बाजूने आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला पकडून ठेवले व रॉकेल त्याच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिले. आकाशच्या मोठमोठ्याने आरोळ्या एकू येवू लागल्या नंतर घरातील व आजूबाजूचे लोक जागे झाले. मुलगाआकाश पेटलेल्या अवस्थेत तसाच घराकडे पळत सुटला. आगीच्या मोठ्या ज्वाळांनी पेटलेला  व  किंचाळनारा आकाश समोर दिसताच घरातील सर्व जन त्या दिशेने धावले. सर्वांनी त्यांना गोधडीच्या सहायाने लपेटून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीमध्ये  आकाशचे सर्व शरीर होरपळून निघाले होते. त्यानंतर त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्याची प्राणज्योत रविवारी सायंकाळी साडेसहा वाजनेचे सुमारास मालवली .  चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्याच्या शासकीय रुग्णालयात आकाश याचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदवून घेतला होता. चाकण पोलिसांत या प्रकरणी दोन अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर,चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.  आकाशयाचे आई-वडील हे शेतकरी असून आई- वडिलांचा लाडाचा एकुलता आकाश कोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता.  या धक्कादायक घटनेने कोरेगावखुर्द परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  अचानकपणे मुलाला पेटवून देण्या विषयीचे गूढ दुसऱ्या दिवशी पर्यंत कायमच होते. पोलिसांनी गावातून या बाबत काही माहिती पुढे येते का या बाबत जोरदार तपास मोहीम सुरु केली आहे. 

आकाशच्या जबाबावरून घटनास्थळी शोध:   
  पोलिसांनी आकाश याने आपल्या जबाबात दिलेल्या माहिती नुसार घटनास्थळी कसून शोध घेतला आहे. आकाश घरापासून सुमारे दोनशे फुटांवर ज्या टेकडीवर शिताफळाच्या झाडा जवळ प्रातविधी साठी गेला होता त्या ठिकाणी पोलिसांना रॉकेलच्या तीन मोकळ्या बाटल्या व आगपेटी पालापाचोळ्याखाली लपविलेली आढळून आली आहे. परिसरातील नागरिकांनी आणि घरातील नातेवाईकांनी त्याला ज्वाळांनी लपेटलेल्या अवस्थेत पळताना पाहिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांना आकाश ज्या मार्गाने पळत आला त्या मार्गावर त्याच्या अंगावरील जळलेल्या कपड्यांचे तुकडेही मिळून आले आहेत. दरम्यानआकाश याने पोलिसांना दिलेल्या जबाबात त्या दोन इसमांनी रॉकेल ओतून पेटवून देताना ‘आता तू राहातच नाहीस’.. असे म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

अद्याप धागेदोरे नाहीत: 
आकाश याला पेटवून देणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत. तपास सुरू असून ठोस धागेदोरे आमच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे आकाशचा खून कोणत्या कारणासाठी व कोणी केला हे आत्ताच सांगता येणार नाहीअसे पोलिसांचे म्हणणे आहे. कोरेगावात पोलिसांनी कसून तपास सुरु केला असला तरी पोलिसांच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही. परिस्थितीजन्य पुरावे विसंगत वाटत असल्याने या धक्कादायक खून प्रकरणात प्रश्न अवघड आणि उत्तर कठीण अशी अवस्था पोलिसांसमोर उभी ठाकली असली तरी  या घटनेचा उलगडा लवकरच होईल अशी अपेक्षा पोलिसांनी वर्तविली आहे.
 Displaying aakash yache rahate ghar.jpg
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार :  
रविवारी (दि.४) सायंकाळी साडेसहा वाजनेचे सुमारास मृत्यू झालेल्या आकाश याचा मृतदेह ससून सर्वोपचार रुग्णालयातून शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी नंतर आज ( दि.५) सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी पाच वाजनेचे सुमारास कोरेगावात आणण्यात आलेल्या आकाश याच्या मृतदेहावर अत्यंत शोकाकुल वातावरणात सायंकाळी सव्वापाच वाजनेचे सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

------------अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)