गुंतवणूक वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू : मुख्यमंत्री फडणवीस 
 Displaying Volkswagen Engine Assembly Plant Inaugration1.jpg
   ‘महाराष्ट्रात व्यवसाय करणे सुकर’ व्हावे या मूळ संकल्पनेची कास धरून औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.चाकण येथील फोक्सवॅगन इंडियाच्या इंजिन असेम्ब्ली प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,खेडचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ गोरे , मावळचे आमदार बाळा भेगडे आणि  भोसरीचे आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताला जर पुढे जायचे असेल तर महाराष्ट्राला अधिक वेगाने विकसित व्हावे लागेल.त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असून कामगार व उद्योग या दोघांनाही फायदेशीर ठरतील अशा सुधारणा करून कामगार कायदा अधिक लवचिक बनविण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. याप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले,महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक व्हावी त्यासाठी महाराष्ट्रात व्यवसाय करणे सुकर (इज्‌ ऑफ डुईंग बिझनेस) ही मूळ संकल्पना ठेऊन उद्योगवाढीला आम्ही चालना देत आहोत.नवीन उद्योगांसाठी लागणारे 76 परवाने आम्ही 25 पर्यंत पहिल्या टप्प्यात आणणार आहोत.
याप्रसंगी बोलताना फोक्सवॅगन इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश कोदुमुदी म्हणाले,इंजिन टेस्टींग फॅसिलिटीसह असलेला नवीन इंजिन असेम्ब्ली प्लांट भारतातील पहिलाच आहे आणि स्थानिक बाजारपेठेच्या गरजांकरता योग्य तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या आमच्या बांधिलकीवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.1.5 लीटर टीडीआय इंजिन खास करून भारतीयांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले आहे आणि हे आता स्थानिक स्तरावर असेम्बल करता येते.याबरोबरच स्थानिक कौशल्याला चालना देण्याच्या आमच्या दीर्घकालीन उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आम्ही महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
  -----------------
 अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)