न.प. हद्दीच्या मुद्द्यावर बोलावलेली विशेष ग्रामसभा गोंधळातच गुंडाळली चाकण:वार्ताहर संयुक्त चाकण ग्रामपंचायतीची 1984 साली असणारी हद्द कायम ठेवूनच चाकण साठी नगर परिषदेची हद्द ठरवावी अशी सर्वच ग्रामस्थांची मागणी होऊनही कुठल्याही ठोस निर्णयाप्रत न पोहोचता आणि विशेष ग्रामसभा बोलावण्याचा ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला हक्कच उरला आहे की नाही या वरून काही जणांनी गोंधळ घातल्या नंतर चाकण ची नगर परिषदेच्या हद्दीच्या आणि हरकतींच्या मुद्द्यावर आज (दि.13) बोलावण्यात आलेली विशेष ग्रामसभा अक्षरश गुंडाळण्याची नामुष्की ओढवली.. चाकणचे सरपंच काळूराम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या या सभेसाठी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी ,उपसरपंच साजिद सिकीलकर,सदस्य प्रीतम परदेशी , कृष्णा सोनवणे, अमोल घोगरे, दत्तात्रेय जाधव, बानो काझी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप परदेशी ,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील पानसरे, रिपाईचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अतिश मांजरे , उमेश आगरकर ,राम गोरे, धनंजय कदम,विलास बारवकर , राजेंद्र आगरकर,पांडुरंग...