......अन् माया डोळस चा इनकाउंटर झाला
......अन् माया डोळस चा इनकाउंटर झाला 16 नोव्हेंबर 1991 ला अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या परिसरात अचानक पोलिसांच्या गाड्या घोंघावू लागल्या. काही साध्या गाड्यांमधूनही युनिफॉर्ममधल्या आणि साध्या वेषातल्या मंडळींचा वावर अनपेक्षितपणे वाढल्याचं पाहून रहिवासी काहीसे गांगरूनच गेले. त्यातच राज्य राखीव दलाचे पोलिस कमांडो यांना पाहून तर 'कुछ तो बडा लफडा है', अशी चर्चा बारिक आवाजात सुरू झाली. लोखंडवाला माकेर्ट आणि स्वामी समर्थ चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात या प्रकारची टेहळणी कशासाठी चालली आहे, हे कोणालाच कळेना. या धनिकांच्या वस्तीला या साऱ्याची कधीच सवय नसल्याने अनेक जणांनी फ्लॅटचे दरवाजे बंद केले. जे घराबाहेर होते, त्यांनी फोन करून घरातच बसून राहण्याच्या, आतून दार बंद करण्याच्या सूचना दिल्या. दुकानंही पटापट बंद होऊ लागली. एरवी संध्याकाळी इथलं माकेर्ट फुलून गेलेलं असतं. गाड्या अन्यत्र थांबवून पोलिस अधिकारी, शिपाई, कमांडोज वेगवेगळ्या मार्गाने एका बिल्डिंगच्या दिशेनं चालू लागले. अतिशय सावधपणे. त्या बिल्डिंगचं नाव 'स्वाती'. आजही ती बिल्डिंग आहे. आत शिरताच त्यांना एक जीप आणि ए