युवाशक्तीत देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद ;पंतप्रधान मोदी
युवाशक्तीत देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद ; पंतप्रधान मोदी चाकण मध्ये जीईच्या प्रकल्पाचे उद्घाटन चाकण : भारतातील युवा शक्ती मध्ये प्रचंड कौशल्य असून त्याच्याच आधारे जगातील उद्योगांना भारताकडे आकर्षित करून देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती करण्याची ताकद येथील युवा शक्तीत आहे. केंद्र सरकारने ‘ मेक इन इंडिया ’ अभियानाला विशेष महत्त्व दिले असल्याने भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने जगातील कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी समोर येण्याचे आवाहन करताना भारतात व्यापार उद्योग करणे अधिकाधिक सोपे करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४) चाकण (ता.खेड , जि.पुणे) येथे स्पष्ट केले. इलेक्ट्रिक उपकरणांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (जीई) या कंपनीच्या चाकण मधील प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत