तीन पत्तीचा जुगार हातोहाती
तीन पत्तीचा जुगार हातोहाती
चाकण : अविनाश दुधवडे
आठ - दहा वर्षा पूर्वी पर्यंत श्रीमंतीचे लक्षण असलेला मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात दिसू लागले आहेत. मोबाईल वापरण्यात युवक- युवती अधिक तत्पर दिसतात. विविध कंपन्यांचे मोबाईल बाजारात आल्याने युवकांमध्ये "क्रेझ' तयार झाली ती "स्टायलिश' मोबाईलवापराची. सध्याचे इंटरनेटचे युग असून, युवक इंटरनेटची सुविधांसह कॅमेरा, ब्लू टूथ, गेम्स,चॅटिंगची सुविधा असलेल्या मोबाईल कडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. फेसबुक ,व्हॉसअप, सारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा वाढता वापर आणि मोकळ्या वेळेत मोबाईलच्या माध्यमातून गेम्स खेळण्याचे फॅड वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
इंटरनेटच्या युगामुळे माणसे अधिकाधिक जवळ येऊ लागली आहेत. धावपळीच्या वेगवान युगात कोणतीही गोष्ट तत्काळ व्हावी, असे प्रत्येकाला वाटते. मोबाईलमुळे व्यक्ती देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यांत असली, तरी तिच्याशी त्वरित संपर्क साधता येतो. यामुळे मोबाईल ही गरजेची वस्तू झाली आहे. युवकांमध्ये मोबाईल हाताळणाऱ्यांचे प्रमाण नव्वद टक्के आहे. मित्रांशी संवाद साधला जावा, इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहितीच्या आधारे स्वतःला अपडेट करता यावे यासाठी युवकांचा ओढा इंटरेनट असलेल्या मोबाईलकडे अधिक आहे. गेल्या चार-सहा वर्षात ग्रामीण भागातही मोबाईल वापराचे प्रमाण सर्वत्रच वाढले आहे. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. आवश्यकता नसतानाही केवळ दुसऱ्याजवळ आहे. त्यामुळे हौस म्हणून मोबाईल घेतात. काही काम नसले, की मोबाईल हातात घेऊन गेम खेळणे, गाणी ऐकणे, व्हिडिओ क्लीप्स पाहणे, एसएमएस करणे, मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करणे, इंटरनेट पाहणे असे उपयोग युवक करतात.
मोबाईल फोन्स सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या नंतर साध्या-सुध्या मोबाईल गेम्स (२००५ च्या दरम्यान ) बाजारात होत्या. नोकिया ११०० वगैरे फोन च्या माध्यमातून सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेला गेम म्हणजे’स्नेक’. अतिशय साधा, कुठलेही डोळे दिपवणारे ग्राफिक्स नाहीत, कुठलंही संगीत नाही, अशा गेम्स मोबिल मध्ये होत्या. त्यानंतर आता पर्यंत झालेल्या मोबाईल क्रांतीने मोबाईलवरची टेम्पल रन , अँग्री बर्ड, चेन्नई एक्सप्रेस, क्रिश ३ अशा असंख्य गेम्स तासनतास मोबाईलवर खेळण्यास मुले युवक अधिक पसंती देतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढत आहेत.
तीन पत्तीचा जुगार सर्रास :
सध्या सर्वत्र धूम करीत असलेल्या अँड्रॉइड सिस्टीमच्या मोबाईलवर सर्वाधिक खेळला जाणारा खेळ म्हणजे तीन पत्ती हा जुगाराचा खेळ आहे. सकाळी उठल्यापासून मध्यरात्री पर्यंत अनेक डाव या गेम च्या माध्यमातूनखेळले जात असल्याचे वास्तव आहे. फेसबुक सारख्या सोशल साईट वरून मित्रांना ऑनलाईन बोलावून मध्यरात्रीपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या खेळात मुलांपासून युवतीं पर्यंत अनेक जन आघाडीवर असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. अँन्ड्रॉइड फोनवर अनेक मंडळी या मोफत गेमचा आनंद लुटत आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रायव्हेट टेबलच्या माध्यमातून आपसात ठरवून तीन पत्ती हा प्रचलित जुगार प्रकार आता मोबाईल इंटरनेटच्या हातोहाती खेळला जात आहे. या खेळासाठी पूर्वी प्रमाणेएकत्र बसण्याची गरज राहिलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या सोयीने हवे तीथे बसून हा खेळ खेळू शकत आहे. अशा जुगारावर कायद्याचेही नियंत्रण आणणे अशक्यप्राय असल्याने रात्रंदिवस ऑनलाइन तीन पत्ती खेळ खेळणाऱ्यांची संख्या चाकणपंचक्रोशीसह तालुकाभरात झपाट्याने वाढत आहे. मोफत तीन पत्ती गेमपर्यंत याचा पुरस्कार ठीक असला तरी प्रत्यक्षात जुगारासाठी होणारा याचा वाढता वापर सर्वांचीच चिंता वाढविणारा असल्याचे बोलले जात आहे.
Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा