चाकणला रंगला माजी विद्यार्थी मेळावा
चाकणला रंगला माजी विद्यार्थी मेळावा
१९८३ ते २०१३ पर्यंतचे अनेक माजी विद्यार्थी सहभागी
माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी |
चाकण :
चाकण शिक्षण मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज (दि.२८) अभुतपूर्व उत्साहात पार पडला. १९८३ पासूनचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत महाविद्यालायावरील आपले प्रेम व्यक्त केले. यानिमित्ताने जुन्या मित्रांची भेटही घडून आली. गुरूदक्षिणा म्हणून संस्थेस पुढील काळात लागणारी सगळी मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आप-आपल्या मनोगतात बोलताना दिले.
या महाविद्यालायाचे संस्थेचे विश्वस्थ मोतीकाका सांकला ,प्राचार्य प्रा.डॉ.राजेश लाटणे आणि माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून व शिक्षकांच्या परिश्रमातून माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी १९८३ पासूनच्या शेकडो विद्यार्थ्यांचे पत्ते शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. संस्थेचे विश्वस्थ मोतीकाका सांकला यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव डॉ.अविनाश अरगडे, आदींसह प्रा. शिवाजी एंडाइत , प्रा. डॉ. दिलीप कसबे, प्रा. सोपान घोळवे, प्रा. शैलेश कांबळे ,प्रा. रसाळ, प्रा. आपटे, प्रा. हेमकांत गावडे प्रा. आपटे, माजी विद्यार्थी व विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख रामदास धनवटे, उद्योजक राजेंद्र गोरे, राजेश कांडगे नाणेकरवाडीचे माजी उपसरपंच सुनील नाणेकर , खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे, अँड. पुष्कराज परदेशी , अँड. किरण झिंजुरके, अँड. प्रीतम शिंदे , शिवाजी चौधरी, प्रा.देशमुख ,राहुल वाडेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना घरच्या गरिबीच्या परिस्थितीत शिक्षकांनी मदत केल्यानेच आज जीवनात यशस्वी झाल्याची कृतार्थ भावना व्यक्त केली. शाळेचे अनेक विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर असून या विद्यार्थ्यांनीही आठवणींना उजाळा दिला.प्राचार्य लाटणे म्हणाले, या महाविद्यालयातून चारित्र्यवान व संस्कारक्षम विद्यार्थी घडले आहेत. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारावर आधारित शिक्षण दिल्यानेच आज एका हाकेत शेकडो माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. येथील शिक्षकांनी तुम्हाला घडवले असून जीवनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी गोरगरिब विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत्र धरावे. यापुढे प्रतिवर्षी माजी विद्यार्थी मेळावा घेणार असल्याचे संस्थेचे विश्वस्थ मोतीकाका सांकला यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी सुनील नाणेकर यांनी आपल्या खास शैलीत केले तर आभार प्रदर्शन राजेश कांडगे यांनी केले .
---------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा