सत्ताधारी पाकीटमारांपासून सावध राहा ; आदित्य ठाकरे
सत्ताधारी पाकीटमारांपासून सावध राहा ; आदित्य ठाकरे
काँग्रेस -राष्ट्रवादीचा शेलक्या शब्दात समाचार
आदित्य यांनी युवकांशी साधला थेट संवाद
चाकण: -
राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पाकीटमार आहेत , या पाकीटमारांपासून सावध राहा, महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून यात कार्यरत असलेला राष्ट्रवादी हा पक्ष भ्रष्टवादी आहे , अशा भाषेत सत्ताधारी पक्षांचा लांबलचक भाषण करण्या ऐवजी मोजक्याच शब्दांमध्ये समाचार घेत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (दि ५) चाकणसह ठिकठिकाणी दिमाखदार 'रोड शो' करीत युवकांशी संवाद साधला.
शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दौर्यावर असलेले आदित्य ठाकरे आज सुपारी एक वाजनेचे सुमारास चाकण येथील माणिक चौकात आले होते . येथे आल्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षांवर कडक शब्दात टीका करीत तरुणांशी संवाद साधला . ते पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सर्वसामान्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करणारी आघाडीची ही राक्षसी सत्ता उलथून टाकण्याचे आवाहन करीत येथे उपस्थित युवकांना प्रश्न विचारून आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही मंत्रालयात कधी गेला आहात काय? गेला नसाल तर जाऊच नका. कारण, मंत्री पाकीटमार आहेत. तुमच्या खिशातील पैसे काढून घेण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. आघाडी शासनातील मंत्र्यांनी सर्वसामान्यांच्या घरात वीज द्यावी, नंतरच आपल्या गाडीवर लालदिवा लावून मिरवावे. मंत्रालयाबाहेर आता पाकिटमारांपासून सावधान, असा बोर्ड लावण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्राचे सरकार फक्त दोन कामे करते, ‘ते नकली धोरण व नकली धरण’ बांधण्याचे. अजूनही तुम्हाला राग येत नाही का, आता परिवर्तन करा, अशी हाकही त्यांनी यावेळी दिली. केंद्रात नरेंद्र मोदीजींचे आणि राज्यात उद्धवजींचे सरकार येऊ द्या युतीचे सरकार सर्वसामान्यांचे राहील, सर्वसामान्यांची कामे करील, अशी आश्वासने देत त्यांनी शिक्षण, शेती,बी-बियाणे, वीज, बेरोजगारी आदीसंदर्भात प्रश्न उपस्थितांना विचारले. राज्यात झालेल्या आदर्श घोटाळ्यासह विविध घोटाळ्यांवरही त्यांनी यावेळी भाष्य करून आघाडी सरकारवर टीका केली. महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे डोनेशन, विजेचा प्रश्न, चाकण एमआयडीसीत स्थानिकांना न मिळणारा रोजगार आदींचाही आपल्या खास शैलीत समाचार घेतला. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही विचार व्यक्त करताना शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा प्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख गणेश सांडभोर, भाजपा युवा मोर्चाचे संदीप सोमवंशी , शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अविनाश रहाणे, प्रकाश वाडेकर, लक्ष्मण जाधव, युवा सेनेच्या अमृता गुरव, महिला आघाडी जिल्हासंघटक विजया शिंदे, तालुका संघटक क्रांती सोमवंशी , आरपीआयचे संतोष जाधव ,रुपाली पांडे-परदेशी, प्रीतम शिंदे,शेखर पिंगळे, दत्ता कंद, आदींसह शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
ठाकरेंचा रोड शो दमदार :
आदित्य ठाकरे यांचा या भागातील रोड शो दिमाखात झाला . शेकडो दुचाकीस्वार कार्य कार्यकर्त्यासह रॅली काढण्यात आली. आपल्या कारच्या टपावर बसनू आदित्य ठाकरे रॅलीतून सर्वांना हातवर करुन अभिवादन करत होते. ‘अरे आवाज कुणाचा.. , आला रे आला ... ,अशा शिवसेनेच्या पारंपारिक घोषणांनी हा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. नियोजित वेळे पेक्षा तब्बल अडीच तास उशीर होऊनही युवकांनी माणिक चौकात तोबा गर्दी केली होती. या रॅलीच्या नंतर ठाकरे यांनी युवकांशी संवाद साधत एमआयडीसीतील रोजगारापासून कांद्याच्या भाव पर्यंतच्या स्थानिक प्रश्नांना हात घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
------------
फोटो : मेल करीत आहे.
फोटो ओळ: युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमास शिवसैनिकांसह चाकण मधील युवकांनी मोठी गर्दी केली होती . (छाया :अविनाश दुधवडे,चाकण)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा