प्रलोभनांना बळी न पडता मतदान करू ....
प्रलोभनांना बळी न पडता मतदान करू ....
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
चाकण मध्ये महसूलचा उपक्रम
चाकण:
' धर्म, जात, समाज, भाषा यांचा विचार न करता आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आम्ही मतदानाचा हक्क बजावू' अशी शपथ चाकण (ता.खेड) येथील शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज (दि..१३) घेतली. शासनाच्या महसूल विभागामार्फत मतदानाबाबतची जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून त्यांच्या आवाहनानुसार हा कार्यक्रम चाकण शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात आयोजित केला होता.
मी मतदान केले नाही तर काय फ रक पडेल असा विचार करणे लोकशाहीस घातक आहे. नागरीकांनी लोकशाहीला समृध्द करण्यासाठी, योग्य व प्रामाणिक सरकारच्या निर्मितीसाठी मतदान प्रकिया महत्वाची असते. युवा मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठीच' मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवून आगामी निवडणुकीत आम्ही मतदान करूच; परंतु दुसर्यालाही मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊ. लोकशाहीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, यासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करू, अशी शपथ पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे म्हणाले कि, सुदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी तरुणांनी मतदानाचे महत्व ओळखून निर्भय आणि निष्पक्षपातीपणे मतदान करावे. मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे, 'भारतीय राज्य घटनेनुसार प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. धर्म, जात, समाज, भाषा यांचा विचार न करता आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. माझ्या एका मताने काय होणार हा विचार न करता एक एक मिळून हजारो, लाखो मते होतात हे लक्षात घ्यावे. भारताची लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी मतदान आवश्यक असल्याचे लक्षात घ्यावे असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना खराडे यांनी केले. तरुणाईने शंभर टक्के मतदान करून एक नवीन पायंडा निर्माण करावा, जेणेकरून येत्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्यांच्या योगदानाचे नेहमी अनुकरण केले जाईल, अशी प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी येथे व्यक्त केली.या प्रंसगी प्रशालेचे प्राचार्य प्रा.डॉ.राजेश लाटणे , संस्थेचे सहसचिव डॉ.अविनाश अरगडे, महसूल विभागाचे बंडेश आवटे ,अमृत धाडगे, मिलिंद भुजबळआदींसह प्रा. शिवाजी एंडाइत , प्रा. डॉ. दिलीप कसबे, प्रा. सोपान घोळवे, आदींसह विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
----------------------
अविनाश दुधवडे,चाकण 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा