गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा....

गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा....
Displaying police nirikshak yanna niro detana adhikari vkarmchari.JPG 
चाकण:वार्ताहर -
   'पोलिसांतील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरागणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झराया पोलीस दलातील प्रचलित गीताचा चाकण मध्ये सोमवारी (दि.१७) सर्वांनाच अनुभव आला .एरवी कायदे - नियम,नियमांच्या चौकटी,   कठोर शासन यात राहणारे पोलीस कर्मचारीअधिकारी. त्यांच्यात याच प्रशासकीय चौकटीत राहून निर्माण झालेल्या परस्पर नात्यांच्या भावनांचा ओलावा आणि मानवी चेहरा पहावयास अनुभवास मिळाला तो चाकणचे मावळते पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या भावपूर्ण निरोप समारंभाच्या निमित्ताने. चाकण पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या निरोपाच्या छोटेखानी कार्यक्रमात एरवी दिसणारी पोलिसांची अरेरावी करणारी प्रतिमा पहावयास न मिळता हळवे झालेले आणि चक्क  ढसाढसा रडणारे पोलीस पहावयास मिळाले.

 नूतन ठाणेदार अद्याप चाकण पोलीस ठाण्याला मिळालेले नाहीत मात्र बदली झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांना तत्काळ सध्याचा पदभार सोडून बदली झालेल्या नवीन ठिकाणी हजर होण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश सोमवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात आले.  त्यामुळे बदली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे पदभार सोपविला. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गेली पावणेतीन वर्षे येथे कार्यरत होते.  निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी चाकण पोलीस ठाण्याची सर्व प्रशासकीय यंत्रणा  त्यांच्या निरोप समारंभात हळवी झालेली पहायला मिळाली. या निरोप समारंभाला उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.  यावेळी सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी महिला दक्षता समिती व  विविध संघटनांनी सुशील कदम यांना निरोप दिला.
सामान्य नागरिकांशी कदम यांची असलेली आस्थेवाईकपणाची वागणूक,ज्येष्ठ नागरिकमहिला यांना त्यांनी दिलेली सन्मानाची वागणूककर्मचा-यांशी जपलेला जिव्हाळा आणि हे करीत असतांना पावलोपावली जपलेली कर्तव्यदक्षता. प्रत्येक कामाची प्रत्यक्ष स्वतः जाऊन केलेली खातरजमा,हाताखालच्या यंत्रणेला दिलेले प्रोत्साहन यासारख्या अनेक आठवणींना बोलणा-या सा-याच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी उजाळा दिला.  प्रशासकीय सेवा आणि बदल्यापदोन्नत्या या ठरलेल्याच असतात. पण प्रशासकीय चौकट सांभाळून लोकांचे प्रेम मिळविणे हेच कदम यांचे मोठेपण यानिमित्ताने साऱ्यांनाच दिसले.  या बाबत बोलताना निरीक्षक कदम म्हणाले कीचाकणच्या शहरवासीयांनी मला भरभरून प्रेम दिलेत्या बळावरच येथे सर्वाधिक पोलीस मित्र बनविण्यात यश मिळाले. तसेच ठाण्याअंतर्गंत पोलीस पाटलांच्या सहकार्याने शांतता व सुव्यवस्था अधिकाधिक आबाधिकत ठेवण्यात यश मिळाले मी चाकणच्या जनतेला कदापी विसरू शकणार नाही असेही ते म्हणाले. निरोप समारंभात आपल्या अश्रूंना मोठय़ा मुश्किलीने बांध घालून पोलीस निरीक्षक कदम यांनी सपत्नीक सर्व पोलीस सहकार्‍यांसह सर्वांचे आभार मानले.
---------------
Avinash Dudhawade,Chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)