पोस्ट्स

मार्च, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकीय घडामोडींवर चर्चा रंगू लागल्या...

इमेज
देवदत्त निकम                                                                                           खासदार शिवाजीराव आढळराव      राजकीय  घडामोडींवर चर्चा रंगू लागल्या... चाकण:  अविनाश दुधवडे  शिरूर लोकसभा मतदार संघात्तील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होताच निवडणुकीबाबतच्या चर्चानी आता चांगलाच जोर पकडला असून एकाच तालुक्यातील दोन उमेदवार असल्याने राजकीय घडामोडींच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.  पक्षीय पातळीवर बैठका ,  मेळावे ,  सभा घेऊन संपर्क वाढविला जात असतानाच ग्रामीण आणि शहरी भागातही निवडणुकीच्या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.  पक्षांतर्गत सत्तासंघर्ष  ,  एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारण आणि बड्या नेत्यांमधील शहकाटशह यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली कोंडी व  राज्यातील सत्तेची फळे चाखण्यातच रस असलेल्या आमदारांमुळे  '  राष्ट्रवादी  '  ला शिरूरमध्ये उमेदवार शोधण्याची करावी  लागलेली  कसरत शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिल्या नंतर संपुष्टात आली असली तरी निकम यांच्य

२०१५ पर्यंत चाकणमधून होणार हजारो वाहनांचे उत्पादन

इमेज
२०१५ पर्यंत चाकणमधून होणार हजारो वाहनांचे उत्पादन वाहनउद्योगाचा चाकणवर फोकस    देशभर धावणार चाकणच्या प्रकल्पातील वाहने   चाकण  ( ता.खेड)  मध्ये उत्पादित होत असलेल्या वाहनांचे बोलके छायाचित्र   ( छायाचित्र: अविनाश दुधवडे , चाकण) चाकण:   कधीकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात चाकण सारख्या भागात आता आलिशान कार उत्पादक कंपन्यांनी जबरदस्त जम बसविला आहे. वाहन उत्पादनाच्या बाबत थेट अमेरिकेच्या डेट्रॉईटशी तुलना होणाऱ्या चाकणचा प्रवास आता वेगाने सुरु आहे. चाकण- तळेगाव   औद्योगिक वसाहतींच्या प्रगतीचा वेग आशिया खंडात सर्वाधिक आहे. देशाचे "ऑटो हब '  म्हणून प्रसिद्ध झालेल्या या भागात जनरल मोटर्स ,      बजाज ,   टोयोटा ,   व्होक् सवॅगन इंडिया , मर्सीडीजबेंझ , ह्युंदाई , ट ाटा , ब्रिजस्टोन , चीनमधील सॅनी   , फॉटॉन आदी अनेक कंपन्या आल्या आहेत.     चाकण परिसरातील गुंतवणूक वाढतच असून , चीनमधील बड्या सॅनी नंतर आता वाहन उद्योगातील फॉटॉन ने या भागात गुंतवणुकीची मुहूर्त मेढ रोवली आहे.    चाकण च्या प्रकल्पातून चीनच्या गाड्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात धावणार

पाण्यासारखा पैसा घालवून पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच बंद

इमेज
पाण्यासारखा पैसा घालवून पाण्याचे नैसर्गिक प्रवाहच बंद पुणे नाशिक रस्त्यावरील वाकी जवळचा प्रकार पुणे -नाशिक महामार्गावर वाकी( ता.खेड) जवळ ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद करून त्याजागी लहान पाईप टाकण्यात आले आहेत . (छायाचित्र :अविनाश दुधवडे , चाकण)   चाकण:  वाकी(ता.खेड)  येथे पुणे-नाशिक रस्त्याच्या खालून जाणारा मोठा ओढा आता पूर्णपणे बुजवण्याचा घाट घालण्यात आला आहे. पैसा पाण्यासारखा खर्च करून पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे.  मोठ्या ओढ्यांना अटकाव करीत त्याजागी लहान पाईप टाकून पाणी वाहून जावे यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे. बड्या व्यावसायिक इमारतींचे  इतके मोठे काम करताना संबंधिताना जलवहनशास्त्र (हायड्रॉलॉजी) लक्षात आले नाही का ?  आणि लक्षात आले असेल तर रस्त्याखालून जाणारे भले मोठे ओढे कुठे गेले ,  असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या बाबत लगतच्या भागातील शेतकर्यांनी सरकार -दरबारी दाद मागण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याची फारशी गांभीर्याने दाखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात शिंदेवाडी सारखी घटना या भागात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विकसक -बिल्डरांनी घायची कि

चाकणला रंगला माजी विद्यार्थी मेळावा

इमेज
चाकणला रंगला माजी विद्यार्थी मेळावा १९८३ ते २०१३ पर्यंतचे अनेक माजी विद्यार्थी सहभागी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी   चाकण :   चाकण शिक्षण मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज (दि.२८) अभुतपूर्व उत्साहात पार पडला. १९८३  पासूनचे माजी विद्यार्थी ,  विद्यार्थिनी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत महाविद्यालायावरील  आपले प्रेम व्यक्त केले. यानिमित्ताने जुन्या मित्रांची भेटही घडून आली. गुरूदक्षिणा म्हणून संस्थेस पुढील काळात लागणारी सगळी मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आप-आपल्या मनोगतात बोलताना दिले.   या  महाविद्यालायाचे संस्थेचे विश्वस्थ मोतीकाका सांकला  , प्राचार्य प्रा.डॉ.राजेश लाटणे आणि माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून व शिक्षकांच्या परिश्रमातून माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी १९८३  पासूनच्या शेकडो विद्यार्थ्यांचे पत्ते शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. संस्थेचे विश्वस्थ मोतीकाका सांकला यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव डॉ.अविनाश अरगडे , 

दक्षता समितीने केले पाटील यांचे स्वागत

इमेज
दक्षता समितीने केले पाटील यांचे स्वागत चाकण: अविनाश दुधवडे  चाकण पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांचे स्वागत तर येथून बदली झालेले पोलीस निरीक्षक सुशील कदम यांना चाकण महिला दक्षता समितीच्या वतीने आज (दि. २७) निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले कि ,  महिला दक्षता समितीच्या माध्यमातून स्रीयांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न या पुढील काळातही सुरु राहणार आहेत. पोलिसांच्या मदतीने महिला गुन्हे रोखू शकतात याचे वारंवार प्रत्यंतर आल्याने दक्षता समितीतील महिलांनी क्रियाशील राहणे आवश्यक आहे. यावेळी  चाकण महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा नंदाताई खांडेभराड ,  यमुनाताई रणपिसे ,   संध्या जाधव , गीताबाई मांडेकर ,  नंदा कड ,  क्रांती सोमवंशी ,   रत्नमाला गळाव ,  डो.विसपुते  ,  साक्षी सातव ,  शोभा कड ,  आदींसह चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ,   महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या. दक्षता समितीच्या अध्यक्षा नंदाताई खांडेभराड खराबवाडीच्या उपसरपंच नंदाताई कड व सर्व सदस्यांनी नवीन पोलीस अधिकारी पाटील यांचे स्वागत केले तर सुशील कदम यांना निरोप दिला. -

तीन पत्तीचा जुगार हातोहाती

इमेज
मोबाईलवरून सोशल साईट सोबतच गेम्सचे जबदस्त फॅड तीन पत्तीचा जुगार हातोहाती चाकण : अविनाश दुधवडे   आठ - दहा वर्षा पूर्वी पर्यंत श्रीमंतीचे लक्षण असलेला  मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात दिसू लागले आहेत. मोबाईल वापरण्यात युवक- युवती अधिक तत्पर दिसतात. विविध कंपन्यांचे मोबाईल बाजारात आल्याने युवकांमध्ये "क्रेझ '  तयार झाली ती "स्टायलिश '  मोबाईलवापराची. सध्याचे इंटरनेटचे युग असून ,  युवक इंटरनेटची सुविधांसह कॅमेरा ,  ब्लू टूथ ,  गेम्स , चॅटिंगची सुविधा असलेल्या मोबाईल कडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत. फेसबुक  , व्हॉसअप ,  सारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा वाढता वापर आणि मोकळ्या वेळेत मोबाईलच्या माध्यमातून गेम्स खेळण्याचे फॅड वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.   इंटरनेटच्या युगामुळे माणसे अधिकाधिक जवळ येऊ लागली आहेत. धावपळीच्या वेगवान युगात कोणतीही गोष्ट तत्काळ व्हावी ,  असे प्रत्येकाला वाटते. मोबाईलमुळे व्यक्‍ती देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यांत असली ,  तरी तिच्याशी त्वरित संपर्क साधता येतो. यामुळे मोबाईल ही गरजेची वस्तू झाली आहे. युवकांमध्ये मोबाईल हाताळणाऱ्यांचे प्रमाण न

निवडणुकीत सोशल मिडीयाचा होणार वारेमाप वापर ...

इमेज
लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा होणार वारेमाप वापर ... चाकण:  अविनाश दुधवडे    यंदाच्या लोकसभा निवडणुक रणधुमाळीत पारंपारिक प्रचार यंत्रणेबरोबरच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या यंत्रणांनी हायटेक यंत्रणेचा वापर करीत इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा आधार घेतला आहे . उमेदवारी निश्चित झाल्यानंतर व निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्या नंतर या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात केली आहे . प्रत्यक्षात उमेदवारी दाखल झाल्या नंतर या प्रचाराला अधिकृतपणा येणार आहे . मात्र मतदार संघाचा मोठा पसारा व तुलनेने  कालावधी अत्यंत अपुरा असल्याने अमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी बरोबरच तांत्रिक साधनांची मदत आत्ता पासूनच घेतली असून ,   फेसबुक , ट्विटर ,  व्हॉट्‌स ऍप ,  मोबाईल मॅसेजिंग तसेच ब्लॉगिंग या माध्यमातून  सोशल मीडियाचा वारेमाप वापर सुरु झाला आहे.     २००९ च्या निवडणुकीच्या वेळेसही इंटरनेट होते. मात्र ,  सोशल मीडिया तितकासा प्रभावी नव्हता. यंदाच्या निवडणुकीत मोबाईलच्या माध्यमातून हातोहाती पोहचलेल्या सोशल मिडियाला प्रचंड महत्व आले आहे.  या पूर्वीच्या निवडणुकी

प्रलोभनांना बळी न पडता मतदान करू ....

इमेज
प्रलोभनांना बळी न पडता मतदान करू .... महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली शपथ चाकण मध्ये महसूलचा उपक्रम चाकण:  '  धर्म ,  जात ,  समाज ,  भाषा यांचा विचार न करता आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आम्ही मतदानाचा हक्क बजावू '   अशी शपथ चाकण (ता.खेड)  येथील शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आज (दि..१३) घेतली. शासनाच्या महसूल विभागामार्फत मतदानाबाबतची जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून त्यांच्या आवाहनानुसार हा कार्यक्रम चाकण शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात आयोजित केला होता.   मी मतदान केले नाही तर काय फ रक पडेल असा विचार करणे लोकशाहीस घातक आहे. नागरीकांनी लोकशाहीला समृध्द करण्यासाठी ,  योग्य व प्रामाणिक सरकारच्या निर्मितीसाठी मतदान प्रकिया महत्वाची असते. युवा मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठीच '  मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ,  याची जाणीव ठेवून आगामी निवडणुकीत आम्ही मतदान करूच ;  परंतु दुसर्‍यालाही मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊ. लोकशाहीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल ,  यासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न करू ,  अशी शपथ पाचशेहून अध

बिरदवडी गावात सात तास बिबट्याचा थरार....

इमेज
बिरदवडी गावात सात तास बिबट्याचा थरार.... चवताळलेला बिबट्या पळून जाण्यात यशस्वी वन विभागाच्या मर्यादा स्पष्ट...... चाकण: अविनाश दुधवडे  बिरदवडी (ता.खेड) गावात बुधवारी सकाळी नऊ सुमारास आलेल्या बिबट्या ने दुपारपर्यंत या भागात थरार केला. सुरुवातीला गावातील एका घरावर सुमारे तासभर मुक्काम ठोकलेल्या या बिबट्याने नंतर बिरदवडीजवळील झाडा झुडपांच्या ओढ्यात सात तास तळ ठोकला आहे. चवताळलेला हा बिबट्या या ओढ्यात दबा धरून बसला असून लगतच्या गावांमध्ये  घबराट पसरली आहे . मोठमोठ्याने डरकाळ्या फोडणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा आणून सापळा लावण्याचा प्रयत्न केला असला तरीही बिबट्या अद्याप पर्यंत जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेले नसून परिसरातील नागरिकांचे लोंढेच्या लोंढे याभागात बिबट्याला पाहण्यासाठी आले आहेत.  झाडा झुडपातून डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याची दहशत या स्थानिक गावकरी आणि आलेल्या प्रत्येक बघ्यांच्या चेह-यावर दिसत होती.  हा पूर्ण वाढ झालेला बलदंड बिबट्या सुमारे सहा फुट लांब असावा व कडूस (ता.खेड) येथे दोन दिवसांपूर्वी हाच बिबट्या आढळला असावा असा वन विभाग