माथाडी संघटनांच्या ओझ्याखालीची घुसमट सुरूच...

माथाडी संघटनांच्या ओझ्याखालीची घुसमट सुरूच...


चाकण: 
राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्याराजकीय नेत्यांशी संबंधित असणार्‍या माथाडी आणि कामगार संघटना औद्योगिक क्षेत्रात आहेत. औद्योगिक भागात ऑल इज वेल चे चित्र वरवर भासविण्यात येत असले तरीही या कारवाया सुरूच असून अशा  कारवायांना प्रशासनापासून स्थानिक गुंड व अनेक बड्या राजकारण्यांचे अर्थपूर्ण पाठबळ आहे.अनेक ठेक्यांमध्ये त्यांचीच भागीदारी असल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा उग्र रूप घेवू लागला आहे. सोमवारी (दि.  २७) चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये काही संघटनांचे प्रतिनिधी दादागिरी करीत आमची माथाडी संघटना घ्या असे धमकावीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 
  वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण एमआयडीसीतील सोन्याच्या धुराने अनेकांचे डोळे दिपले आणि या भागाला निरनिराळ्या समस्यांसह अशांततेचे ग्रहण लागले.  माथाडी संघटनांच्या उपद्रवाने अद्यापही पाठ सोडली नसल्याची तक्रार वारंवार होत आहे.  विविध संघटनांच्या नावाखाली कंपन्यांमध्ये हे दादा लोक प्रवेश करतात.  काही संघटना पहिल्यांदा कामगारांना माथाडींना  ताब्यात घेतात. नंतर त्यांच्या माध्यमातून कंपनी मालकांना जेवणाचे ठेकेआमच्याच माणसांना कामावर घ्याआम्ही म्हणतो तशी  वेतनवाढ द्याया कामगारांना काढात्यांना घ्या,अशा प्रकारची दमबाजी करतात. जे उद्योजक हे ऐकत नसतील त्यांना आंदोलन करूतुमची कंपनी मोडून-तोडून टाकूतुम्हाला येथून पळवून लावू,अशा धमक्याही देतात. त्यामुळे या प्रकारांनी कंपनी मालक व्यवस्थापकच नव्हेत तर कामगारवर्गही अजूनही धास्तावलेलेच आहेत . दादागिरी विरुद्ध कोणी ब्र ही काढायला तयार नाही. कारण तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती गेल्या काही काळात औद्योगिक पट्ट्यात झाली आहे. कंपनीमालकांत  या राजकीय पाठबळावरील तथाकथित गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असलेल्या नावांची दहशत आहे. यातील काही  नावे ऐकली की अनेक व्यवस्थापक ,उद्योजकांना एवढेच काय कामगार वर्गालाही घाम फुटतो.यातील अनेकांना राजकीयपाठबळ असल्याने कोणाचेही भयभीती नाही. निर्ढावलेले हे खादीतील दादा नेत्यांच्या नावाने धमकावून वसुली करीत आहेत.जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे भागीदारीतील ठेके ,क्रेन ,वाहने चालू आहेत .या सर्व बाबी सिद्ध करणे अवघड असून या बाबतचा अनुभव दारुण असल्याने  उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधी निर्भीडपणे काहीही पुढे  येवून सांगण्यास तयार होत नाहीत.  संबंधितांशी भाई मंडळींशी पंगा घेतला किंवा तक्रार केली की काय घडते याचे अनेक थरारक भोग अनेकांनी भोगले आहेत. पर्यायाने या तथाकथित भाई मंडळींचे चांगलेच फावले आहे. बडे राजकारणी आणि प्रशासनाच्याच सहकार्याने सहमतीने या बाबी घडत असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. यात काही कारखानदारही मागे नाहीत त्यांनीही अधिकाधिक बलशाली गुंड ठेकेदारीच्या माध्यमातून आपल्या पदरी ठेवल्याचेही विपर्यस्त चित्रही येथे  पहावयास मिळत आहे.

गुंडोबांचे अतिक्रमण ....
कंत्राटी कामगार पुरवठाआपल्या संघटनेकडून माथाडी कामगार पुरवठा,बांधकाम साहित्य पुरवठावाहन (ट्रान्सपोर्ट )पुरवठाभंगार माल उचलणे,अशा निरनिराळ्या ठेकेदारीच्या माध्यमातून याभागात काहींनी खूप मोठ्या प्रमाणावर माया जमविल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशी कामे मिळविताना सर्रास'बळी तो कानपिळी या म्हणी प्रमाणे मनगटशाहीचा वापर होत असल्याची बाब सर्वश्रुत आहे. राजकारणी आणि संबंधित प्रशासनाची त्यांना अर्थपूर्ण साथ मिळत असल्याने त्यांच्यापुढे भले भले नतमस्तक होत आहेत. सर्व प्रथम चाकण एमआयडीसीत कुरुळी ( ता. खेड) येथील एका लॉजिस्टिक कंपनीच्या  व्यवस्थापकवर पिंपरी मध्ये आपल्या संघटनेशी संबंधित कामगारांना कामावर घेत नसल्याचा राग मनात धरून  तिघांनी गोळीबार करून कोयत्याने वार केले होते. तेंव्हा पासून माथाडीच्या आडून मिळणारा प्रचंड पैसा आणि गुन्हेगारांनी या क्षेत्रात अतिक्रमण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. गुन्हेगारी क्षेत्रात वावरणारी काही मंडळी राजकारणात मोठा दबदबा ठेवून आहेतत्यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याचे धारिष्ट्य दाखवीत नाही.   गुन्हे करणाऱ्या संघटीत टोळ्यांना अंत झाला आहे असे पोलीस प्रशासनकडून ठाम पणे सांगण्यात येत असले तर मग त्याच टोळ्यांच्या नावांचा वापर करून निरनिराळ्या घटनांत औद्योगिक भागात उद्योजकांपासून कामगारांना धमकावणारे आणि खुले आम एकमेकांचे गळे घोटण्याचा पर्यंत करणारे आहेत तरी कोण हा प्रश्न मात्र निरुत्तरच राहतो.
------------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)