विजेच्या खांबांना केबलचा विळखा

                                     विजेच्या खांबांना केबलचा विळखा

अनेक ठिकाणी अनधिकृत केबल
चाकण:
 स्वायत्त संस्थेच्या मालकीच्या कुठल्याही वास्तूचा परवानगीशिवाय कोणीही वापर करू शकत नाही. असे असतानाही केबल चालकांनी संपूर्ण शहरात उभ्या असलेल्या कित्येक पथदीपांच्या खांबांवर केबल पसरवली आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. परंतु त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेला कुठलाही कर वा भाड्यापोटी रुपयाही अदा केला जात नाही. असा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातील व दांडगाईने व्यवसाय करणारी काही मंडळी असल्याने त्यांच्या वाटेला जाण्याचे धाडस कुणीही करीत नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने व अधिकाऱ्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीस हा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे यापूर्वी प्रशासनाचे झालेले नुकसान कोण भरून देणारअसा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.  
  केबल चालकांनी केबल आणि इतर कामांसाठी खासगीशासकीय व निमशासकीय अशा कुठलीही मालमत्ता वापरण्यास हरकत नाही. मात्र त्यापोटी मालमत्ताधारकांना मोबदला द्यावा. काही ठाराविक खासगी व्यक्ती मोबदला घेतात. केबल चालकही तो देतात. परंतु ग्रामपंचायत वीज वितरण कंपनीबीएसएनसल त्याकडे लक्ष देत नाहीत. एकाही विभागाने मोबदल्यासाठी केबल चालकांकडून मागणी अथवा वसुली केली नाही. यातून ज्या खात्यांच्या मालमत्तेचा वापर केबल चालक करत आहे त्या एकाही विभागाने मोबदला न घेवून शासनाच्या आदेशाचेच उल्लंघन केले आहे.

अधिकारी म्हणतात
अपघात झाल्यास विद्युत उपकरणे जळतीलजीवितहानीही होऊ शकते . म्हणून आमच्या कर्मचारी अधिकार्यांुना केबल काढून घेण्यासाठी संबंधित केबल चालकांना नोटीस देण्यात येणार आहेत. त्यांच्या केबल आणि आमच्या वायरमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काही अपघात घडला तर लोकांचे टीव्ही किंवा इतर उपकरणे जळतीलचपण प्राणहानीचाही धोका आहे. म्हणून अशा दिसणाऱ्या केबल आम्ही काढून टाकतो असे वीज वितरणच्या अधिकार्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण शहरभर अशा विजेच्या खांबांचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  दरम्यान केबल चालक दादागिरी करणारे व स्थानिक असल्याने अशा केबल काढून टाकनाऱ्या कर्मचार्यांाना प्रसंगी मारहाणही करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी या बाबत संपर्क साधला असता त्यांनी या बाबत ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळा समोर हा विषय ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरभर बेकायदेशीर पणे केबल पसरविणाऱ्या व्यवसायिकांसाठी नियमावली करण्याची मागणी होऊ लागली असून केबलच्या भाड्यापोटी भरमसाठ देयके घेणाऱ्या या मंडळींसाठी ठोस नियमावली असावी यासाठी चाकण ग्रामपंचायतीच्या येत्या ग्रामसभेत यासाठी मागणी करणार असल्याचे काही नागरिकांनी सागितले. 
  दरम्यान अवैधरीत्या केबल व्यवसाय  करणारी काही मंडळीही लगतच्या काही भागात  कार्यरत असल्याची चर्चा आहे. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम १९२३/ ४ (२) बी अंतर्गत परवाना प्राप्त न करता तसेच केबल टीव्ही नेटवर्क (रेग्युलेशन) ऍक्टकनुसार नोंदणी न करता पूर्णत: अवैध केबल व्यवसाय करणाऱ्यांचीही तपासणी होण्याची मागणी होत आहे. त्यासाठी या भागात केबल सर्वेक्षण मोहिम उघडून त्यातील तथ्य उघडकीस आणण्याची मागणी होत आहे. त्याच प्रमाणे  केबल व्यावसायिक आणि शासनाचे अधिकारी हे खोटी माहिती शासनाला पुरवून केबलची संख्या कमी दाखवित असल्याचीही चर्चा आहे.
-----------
~ अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)