रिलायन्स खोदकामाचे गूढ उकलणार का?
प्रश्न कठीण अन उत्तर अवघड

चाकण: 
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने चाकण मध्ये खोदकाम करताना ६०० मीटरची परवानगी मागून प्रत्यक्षात संपूर्ण शहर खोदले आणि यासाठी ६८ लाखांचा डिमांड ड्राफ्ट दिल्याचे पत्र पाठविले . हे पत्र आल्याने संबंधित खोदकाम रिलायन्सने केल्याचे आणि त्यासाठी काही रक्कम अदा केल्याचे नागरिकांना कळाले ,यात मागितलेल्या परवानगी पेक्षा अधिक खोदकाम करीत खुद्द चाकण ग्रामपंचायत प्रशासनाचीच फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.
   याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने रिलायन्स कंपनी कडे या बाबतचे वास्तव समोर आणण्यासाठी वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून या बाबतची कागदपत्रे समोर आणण्यात रिलायन्स कंपनीकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे निर्माण होणारे प्रश्न अनेक उत्तरांचे धनी ठरत आहेत.    रिलायन्सकडून येथे एफओसी (फोर-जी) केबल लाईन टाकताना मोठी अनियमितता झाल्याचे एव्हाना स्पष्ट झाले असले तरी या धक्कादायक प्रकारा बाबत सर्वानीच डोळ्यावर कातडे ओढण्याची घेतलेली भूमिका सामान्य चाकणकरांना आश्चर्यचकित करणारी असल्याची चर्चा सध्या शहरात आहे. रिलायन्स कंपनीच्या या खोदकाम घोटाळ्याचा तपास अजून तरी शून्यावरच आहे.
   या बाबतचे वृत्त असे किरिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनी केबल टाकण्याचे काम चाकण मध्ये बेमालूम सर्वच ठिकाणी केले आहे . यामध्ये संपूर्ण  चाकण शहरात एफओसी (फोर-जी) केबल लाईन टाकण्यात आली . संपूर्ण शहर खोदताना रिलायन्सच्या कंत्राटदाराने जून २०१३ मध्ये केवळ ६०० मीटरची परवानगी मागितल्याचे समजते.  मात्र परवानगीचा दाखला कोणी संबंधिताना दिला हे कुणालाही आठवत नसल्याचे प्रशासनकडून समजते.  मागील आठवड्यात चाकण ग्रामपंचायतीला रिलायन्स जिओ कंपनीचे  पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये या कामासाठी ६८ लाख ७५ हजार रुपये अदा करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.  प्रत्यक्षात या कामासाठी ग्रामपंचायतीची एक लाखांची पावती फाडण्यात आली असल्याचे ग्रामपंचायत दप्तरी असलेल्या नोंदीवरून नंतर उघडकीस आले होते.  रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनी केबल टाकण्याचे काम करण्यासाठी संबंधित खाजगी कंत्राटदाराने शहरातील अनेक भागात जेसीबीच्या सहाय्याने दोन ते अडीच फूट खोलीकरण करून एका ऐवजी तीन केबल लाईन टाकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. शहरातील सर्वच रस्त्यांच्या कडेने या खोदाईमुळे राडारोडाही पडला होता. या बाबत चाकण ग्रामपंचायतीचे दयानंद कोळी यांना विचारले असता त्यांनी सांगितले किसंबंधित रिलायन्स कंपनीच्या अधिकार्यांना या बाबत वारंवार संपर्क करण्यात आला आहेया बाबत त्यांना मेल करण्यात आले आहेतमात्र त्यांनी अद्याप पर्यंत ग्रामपंचायतीत येवून काहीही अधिकृत माहिती व खुलासा केलेला नाही. संबंधित रिलायन्सचे अधिकारी यांच्याशी कधीही आपण या खोदकाम आणि त्यासाठीच्या परवानगी संदर्भात बोललेलो नाही. त्याच प्रमाणे त्यांना खोदकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीतून कुणी दाखला दिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिलायन्सच्या अधिकाऱ्यांकडून या बाबत अधिकृत पणे खुलासा झाल्या नंतर ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाच्या सल्ल्या नुसार पोलिसांत तक्रार करण्याची कार्यवाही करण्यात येईल. या बाबत सरपंच दतात्रेय बिरदवडे यांनी सांगितले कि, संबंधित कंपनी कडून आपणास देण्यात आलेले पत्रच चुकून पाठविण्यात आलेले असून संबंधित ६८ लाखांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हा नियोजन मंडळाला देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. हे म्हणणे खरे मानले तरी संपूर्ण शहरात झालेले राजरोस झालेले खोदकाम, त्यासाठी ग्रामपंचायतीला देण्यात आलेला अवघा एक लाख रुपयांचां निधी आणि काही मंडळीना पोहोचलेले लाखो रुपये याची पाळेमुळे खोदली जाणार का? हा प्रश्न चाकणकरांसाठी सध्या तरी अनुत्तरीत आहे.

झाकली मुठ सव्वालाखाची : 
चाकण शहरात केबल टाकण्याचे काम करण्यात आले....काम करताना ६०० मीटरची परवानगी मागितली ...  प्रत्यक्षात  संपूर्ण शहर खोदले..... रिलायन्स कंपनीचे पत्र आल्या नंतर धक्कादायक खुलासे झाले.... यात लाखो रुपये काहींना मिळाल्याचे कळाले ... प्रत्यक्षात एकच लाख ग्रामपंचायतीला मिळाले. या प्रकरणाची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा आहे. संबंधित कंपनीशी संबंधित आणि काही कारभारी मंडळीना या खोदकामात लाखो रुपये मिळाल्याचे त्यांच्यातीलच मंडळी सांगत आहेत.  हि सगळी स्थिती समोर असतानाही या प्रकरणाच्या खोलात कुणीही जाण्यास तयार नाही. उलट यात अर्थार्जन करून घेणाऱ्या मंडळीनी झाकली मुठ सव्वालाखाची म्हणी प्रमाणे हे प्रकरण दडपण्यासाठी मोठे प्रयत्न चालविल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण पद्धतशीरपणे दडपले जाण्याचीच शक्यता मोठी असली तरीही  'कोंबडे झाकले म्हणूनउजडायचे राहत नाही' .असे नागरिक बोलू लागले आहेत. 
-----------Avinash Dudhawade, chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)