खेड तालुका युवा परिषदेला सर्वपक्षीयांची साथ ...
खेड तालुका युवा परिषदेला सर्वपक्षीयांची साथ ...
चाकण:
चाकणला युवा परिषदेच्या माध्यमातून विविध घटकांच्या समस्या व विकासाच्या अपेक्षा समजावून घेणारे मंथन सर्वपक्षीय युवकांनी प्रथमच घडविले . या मंथनातून खेड तालुक्यातील समस्यांचे दाहक वास्तव समोर आले;तसेच सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास व टिकाटिप्पणीचा धुरळा एकमेकांवर उडविण्या एवजी समस्यांवरील उपायांची शास्त्रशुद्ध मांडणी व त्यासाठी आवश्यक प्रयत्न झाल्यास तर समस्या सुटू शकतात, असा मोठा आशावादही सर्वपक्षीय युवकांमध्ये निर्माण झाला आहे. अशा सर्वपक्षीय युवा परिषदेतून प्रश्नांना वाचा फुटेल ; पण सोडवणुकीचे प्रयत्न होणार का ? अशा प्रश्नांनाही याच परिषदेत उत्तरे मिळाली हे विशेष ....
मंथन -समस्यांची दाहकता- आणि उपायांचे अमृत :
माहिती तंत्रज्ञाच्या माध्यमातून प्रचलित पद्धतीतील दोष मान्य करून नवा दृष्टिकोन अंगीकारायला हवा. यासाठी समाजाच्या गरजांचा अभ्यास सतत व्हायला हवा. साहजिकच हे काम करणाऱ्या युवकांनी सतत अपडेट राहायला हवे, त्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञाचा अधिकाधिक वापर कसा व्हायला हवा यासाठी रवींद्र घाटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी यावेळी सांगितले कि, चाकण भागातील बड्या प्रकल्पांत, कंपन्यांत परकी गुंतवणूक करीत आहेत. विकासाची किंमत असते, चांगल्या सुविधांसाठी ती मोजायची सामान्यांचीही तयारी असते. मात्र यात सामन्यांचा तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न होणार असेल तर माध्यमांमधून या प्रश्नांना वाचा फोडण्यात साठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवा. केंद्रीय पोलीस उपाधीक्षक अमोल राजगुरू यांनी स्पर्धा परीक्षांसाठी तालुक्यातील युवकांना मार्गदशन करण्याची तयारी दर्शविली , तर हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आध्यात्मिक संस्कार शिबिरे घेण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील यशस्वी उद्योजकांनी नवउद्योजकांना मदत आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका मंडळी. उर्मिला सांडभोर यांनी सर्वपक्षीयांनी एकत्रित येवून समस्यांच्या निराकारांसाठी दबावगट निर्माण करण्याची मागणी केली. राजेंद्र सांडभोर यांनी धरणग्रस्तांच्या डोळ्यातील पाण्याचे वास्तव समोर आणले. या परिषदेचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांनी यावेळी प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सर्वपक्षीयांच्या माध्यमातून पुढकार घेतला जाईल व पक्षभेद बाजूला ठेवून तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत असा आग्रह यापुढे केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.
तालुक्यातील वाढते प्रकल्प, वाढते औद्योगीकरण , स्थानिकांना औद्योगिक क्षेत्रात न मिळणारा रोजगार, वाढती गुन्हेगारी, वाहतुकीची समस्या यांसह तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील १०० निवडक युवकांच्या या परिषदेत तालुक्यातील विस्थापित मंडळी, पायाभूत सुविधांचा आभाव , ग्रामविकास आणि शिक्षण, आध्यात्म, अंधश्रद्धा निर्मुलन, करिअर अकादमी,नवउद्योजकांना संधी, आदी विविध क्षेत्रात पक्षभेद विसरून काम करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविल्याने यशस्वी ठरली . विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने त्यातून तालुक्याचा भविष्यवेधी अजेंडा तयार करण्याची संकल्पनाही पुढे आली. तालुक्यातील समस्या व उपायांवर बोलणारे, त्याची शास्त्रशुद्ध मांडणी करणारे पुढचे पाऊल या निमित्ताने टाकण्यात आले. प्रास्ताविक परिषदेचे आयोजक माजी परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केले , सूत्रसंचालन दत्ता भालेराव यांनी केले .
-----------------------------Avinash Dudhawade, chakan, 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा