चाकणला खेड तालुका युवा परिषद

चाकणला खेड तालुका युवा परिषद
शरद बुट्टे पाटील यांची माहिती
चाकण: 

खेड तालुक्याचा आणि औद्योगिक विकासाने विस्तारत्या चाकण परिसराचा सर्वांगीण विकास, रखडलेले विविध प्रकल्प व योजना, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या याकडे लक्ष वेधण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पक्षीय युवकांनी पक्षभेद विसरून खेड तालुका युवा परिषदेचे रविवारी (दि.१२) चाकण येथे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध घटकांच्या विकासाच्या अपेक्षा समजावून घेणारे मंथन प्रथमच अराजकीय व्यासपीठावर होणार आहे. सर्वपक्षीय युवक आणि सामाजिक ,शैक्षणिक, पत्रकारिता आदी क्षेत्रात काम करणारे तालुक्यातील युवक या निमित्ताने एकत्रित येणार असल्याने समस्या व उपायांवर बोलणारे, त्याची शास्त्रशुद्ध मांडणी करणारे पुढचे पाऊल या निमित्ताने प्रथमच टाकले जाणार आहे.
तालुक्यातील वाढते प्रकल्प, वाढते औद्योगीकरण , स्थानिकांना औद्योगिक क्षेत्रात न मिळणारा रोजगार, वाढती गुन्हेगारी, वाहतुकीची समस्या यांसह तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील १०० निवडक युवकांची ही परिषद आयोजित करण्यात आली असून यात विविध क्षेत्रातील जाणकारही सहभागी होणार आहेत. या परिषदेचे निमंत्रक माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले कि, समस्या केवळ बोलून सुटत नाहीत, टिकाटिप्पणीचा धुरळा उडवूनही संपत नाहीत. प्रचलित राजकीय व्यवस्था आणि तिला जाब विचारणारी आंदोलनेही अपुरी ठरतात, तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाणाऱ्या आणि एकमेकांवरचा विश्‍वास वाढवणाऱ्या अराजकीय व्यासपीठाची गरज अधोरेखित होते, या परिषदेच्या माध्यमातून तोच प्रयत्न आहे. यापुढे सामजिक हितासाठी कुणीही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता अशी परिषद बोलवू शकणार आहे. हा प्रयत्न सर्वांना सामावून घेणारा आहे. यात कोणताही विशिष्ट पक्ष, नेता, राजकारण अभिप्रेतच नाही. तालुक्यातील समस्या व उपायांवर बोलणारे, त्याची शास्त्रशुद्ध मांडणी करणारे पुढचे पाऊल या निमित्ताने टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
----------------Avinash DUdhawade, chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)