निष्ठावंत कार्यकर्त्यांचे ‘पोलिटिकल रिमिक्स'...

निष्ठावंत कार्यकर्त्यांचे ‘पोलिटिकल रिमिक्स'...


चाकण: 
जाहीर कार्यक्रमांमध्ये मोठमोठी तोंडपाटीलकी गाजविणारे काही एकाच पक्षाचे स्वतःला निष्ठावंत म्हणवणारे कार्यकर्ते स्वत:च्या राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या लालसेपोटी आपली तत्वंनिष्ठा कशी बासनात बांधून ठेवतातआणि सर्रास दुसऱ्या पक्षांच्या वळचणीला जातातयाचा उत्तम नमुना चाकण मध्ये एका उद्घाटनाच्या झालेल्या राजकीय आखाड्यात पहावयास मिळाला.  
  राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतोयाची प्रचीती चाकण मध्ये गेल्या  आठवड्यात रंगलेल्या शिवसेनच्या उद्घाटन आणि राष्ट्रवादीच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या 'पोलिटिकल रिमिक्स'ने करून दिली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचे अस्तित्व संपविण्यासाठी आणि चिखलफेक करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यक्रमात सुरुवातीला झालेल्या उद्घाटन समारंभात सत्ताधारी राष्ट्रवादी मुळे कामे करण्यात कशा अडचणी येतात आणि त्यांची कशी दंडेलशाही आहे याचे चित्र आपल्या भाषणात रंगविणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने नंतर आठच दिवसात त्याच ठिकाणी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा हजेरी लावत त्यांच्याच गळ्यात कसे गळे घातले याची चर्चा आता चाकण च्या ग्रामपंचायत वर्तुळात रंगू लागली आहे. लोकसभेच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असतानाच विकासकामांचे श्रेय कुणाचे यावरून राजकीय पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे.  चाकण शहराच्या पाणी पुरवठ्याच्या टाकीच्या उद्घाटनाला मागील पंधरवड्यात मुहूर्त मिळाला खरा पण ग्रामपंचायतीनेही या टाकीसाठी सहा लाखांचा निधी उपलब्ध करून देवूनही संपूर्ण कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून होत असल्याने व कोनशिलेवरही केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठेपणा देण्यात आल्याची कुरापत काढीत  चाकण ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने या कार्यक्रमाचा निषेध करीत चाकणचे सरपंच व सदस्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.  या टाकीसाठी निधी दिलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मात्र तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीत ठरलेल्या वेळीच उद्घाटन केले.  यावेळी चाकण मधील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने चाकण ग्रामपंचायतीत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून आपणास राष्ट्रवादी मुळे येथे कामच करणे अवघड असल्याचा व आपण ग्रामपंचायती मध्ये आहोत म्हणून ठीक आहे अन्यथा त्यांनी पंचायत विकून खाल्ली असती असा घणाघाती हल्लाआपल्या भाषणात केला. त्याला टाळ्या शिट्यांनी दादही मिळाली आणि दादाही खुश झाले . मात्र त्यानंतर अवघ्या आठवडा भरातच राष्ट्रवादीने याच ठिकाणी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते आयोजित केलेल्या भूमिपूजनास टीका करणारा हाच कार्यकर्ता सर्वात पुढे होता. त्यामुळे जाहीर कार्यक्रमांमध्ये मोठमोठी तोंडपाटीलकी गाजविणारे काही एकाच पक्षाचे स्वतःला निष्ठावंत म्हणवणारे कार्यकर्ते स्वत:च्या राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी आपली तत्वंनिष्ठा कशी बासनात बांधून ठेवतात याची चर्चा याभागात रंगली आहे. असे एक नव्हे तर अनेक कार्यकर्ते या भागात पहावयास मिळत आहेत. आपल्या पक्षांच्या व्यासपीठावर तोंडपाटीलकी गाजवायची आणि इतर सत्ताधारी पक्षांपुढे मानातुकवायच्या असे सर्रास दिसणारे ‘ ताकापुरते रामायणाचे ‘ विपर्यस्त चित्र सामान्य नागरिकांनां मात्रअंतर्मुख करावयास लावणारे आहे.
------------------------
@अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)