'एसी'तील कारभारी हिंडताहेत दारोदारी
चाकण मधील स्थिती
वसुलीत नापास न होण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धडपड
चाकण:अविनाश दुधवडे -
'मार्च एंड'जवळ येवू लागल्याने घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीअभावी चाकण ग्रामपंचायतीच्या च्या उत्पन्नात पडलेला मोठा खड्डा भरून काढण्यासाठी ग्रामपंचायतींतर्फे ग्रामपंचायतीचे कारभारी वसुली करण्यासाठी दारोदारी हिंडत असल्याचे विपर्यस्त दृश्य पहावयास मिळत आहे.खुद्द ग्रामपंचायतीचे पदाधिकारी दारावर येवून वसुलीच्या नोटिशी देवू लागल्याने नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दैनिक पुढारीतील याबाबतची वस्तुस्थिती मांडणारी चौकांमधील होर्डिंग वर झळकणारी वृत्ते व ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांकडून सध्या सुरु असलेला पाठपुरावा यामुळे चाकण ग्रामपंचायतीची वसुली 60 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे चाकणचे सरपंच काळूराम गोरे,व ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले.
चाकण ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी, जागाभाडे वसुलीपोटी अद्यापही सुमारे 1 कोटी रुपयांची वसुली बाकी आहे. मागील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करणाऱ्या प्रशासनाला या वर्षी मात्र नागरिकांनी मेटाकुटीस आणले आहे. चाकण ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी, जागाभाडे वसुली पोटी प्रत्येक वर्षाची मागणी 2 कोटी 10 लाख रुपये आहे. सध्या प्रत्यक्षात साठ टक्के वसुली करण्यात ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळ आणि प्रशासनाला यश आले असले तरी अद्याप निम्मी वसुली बाकी आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीची अनेक देयके थकीत आहेत. त्यासाठी चाकण मध्ये सरपंच काळूराम गोरे , उपसरपंच साजिद सिकीलकर व सर्व सदस्य प्रभाग निहाय याद्या घेवून दारोदारी हिंडत असल्याचे विपर्यस्त चित्र गेल्या पंधरवाड्या पासून पहावयास मिळत आहे.
-------
-------
फोटो मेल करीत आहे.
फोटो ओळ:चाकणचे सरपंच, वसुली कर्मचारी ,सध्या वसुलीसाठी असे दारोदारी हिंडताना दिसत आहेत.
----------------------------------------------------Avinash Dudhawade, 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा