जनसेवा बँक सामाजिक बांधिलकी जोपासणारी : तावडे


जनसेवा बँक सामाजिक बांधिलकी जोपासणारी : तावडे 

चाकण: अविनाश दुधवडे, - 
जनसेवा सहकारी बँक सामाजिक बांधिलकी जाणून काम करणारी सर्वसामान्यांची बँक आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी चाकण जवळ खराबवाडी (ता. खेड) येथे आज (दि.23) केले.
जनसेवा सहकारी बँकेच्या 29 व्या शाखेचा खराबवाडी (चाकण) येथे आज शुभारंभ करण्यात आला. या चाकण शाखेचे व एटीएम सेवेचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तावडे बोलत होते. या प्रसंगी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेड चे आमदार दिलीप मोहिते पाटील, मावळचे आमदार संजय तथा बाळासाहेब भेगडे, खराबवाडीच्या सरपंच योजनाताई सोमवंशी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश गोरडे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पतकी , भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सोमवंशी, पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, तालुका राष्ट्रवादीचे अरुण सोमवंशी, हिंदुस्तान ग्रुपचे संजय राऊत , आशा बुचके, आदींसह  सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
  पुढे बोलताना तावडे म्हणाले की, राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे, या स्थितीत महत्वाच्या बँकांनी मदतीचे हात पुढे केले पाहिजेत. जनसेवा सहकारी बँक यासाठी नक्की पुढाकार घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. व राज्य शासनाच्या विविध धोरणांवर टीका करीत पुढील काळात पुन्हा राज्यात शिवशाहीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार मोहिते, खासदार आढळराव मावळचे आमदार भेगडे ,यांनीही बँकेच्या कामकाजास आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या.
  बँकेचे अध्यक्ष सतीश गोरडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जनसेवा बँकेच्या 28 शाखा असून  बँकेच्या एकूण ठेवी 1287.00 कोटी रुपयांच्या तर एकूण कर्ज 851.00 कोटी रुपयांचे असून एकूण व्यवसाय 2138 कोटी रूपयांचा आहे . समाजातील तळागाळातील लोकांना सहजतेने आर्थिक प्रगती करता यावी यासाठी या बँकेची स्थापना 1972 साली करण्यात आली आहे.बँक आजही सामान्य माणूस केंद्रीभूत मानून विविध योजना राबवीत असून पुढील काळातही राबविण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.
--------------
Avinash Dudhawade ,chakan 9922457475 
----------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)