रमेश पवार यांना सर्व प्रकारची ताकद देणार : उपमुख्यमंत्री पवार
रमेश पवार यांना सर्व प्रकारची ताकद देणार : उपमुख्यमंत्री पवार
मरकळ येथील कार्यक्रमात आश्वासन
चाकण: अविनाश दुधवडे
माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांचे सुपुत्र रमेश पवार यांनी स्वगृही राष्ट्रवादीत परतण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून रमेश पवार यांना याभागात विकास कामे व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य मी स्वतः करणार असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमेश पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत समाधान व्यक्त केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार खेड तालुक्यात मरकळ येथे विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज(दि.2) आले होते. खेड तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे . हा संपूर्ण वर्ग आपल्या सोबत एकत्रितपणे बांधण्यात स्वतः अजित दादा पवार व खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी रमेश पवार यांना स्वगृही आणल्याने यशस्वी ठरले आहेत.
या कार्यक्रमात पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राजकारणात काही निर्णय चुकतात मात्र या चुका सुधाण्याची संधी मिळताच त्या सुधारल्या पाहिजेत ,रमेश पवार यांनी स्वगृही परतत हे सिद्ध करून दाखविले आहे. माझ्या राजकारणाची 1991 मध्ये खासदारकीच्या माध्यमातून सुरुवात झाली त्या काळात खेडचे माजी आमदार स्व. नारायणराव पवार हे खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यांच्या राजकिय जीवनात त्यांनी शरद पवारांच्या विचारांनीच राजकारण केले . तोच आदर्श ठेवून रमेश पवार यांची वाटचाल सुरु असून त्यांना सर्व प्रकारची ताकद देण्याचे काम आमदार दिलीप मोहिते व मी स्वतः करणार आहे. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडा
ट करीत जोरदार घोषणाबाजी केली. आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी तालुक्याच्या राजकारणात स्व.नारायण पवार यांच्यानंतर पवार कुटुंबियांना फसविण्याचे काम काही महाभागांनी केल्याचे सांगत ,चांगल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेवून विकासाचे राजकारण करणार असल्याचे यावेळी सांगितले. रमेश पवार यांच्या पक्ष प्रवेशाने पक्षाला अधिक ताकद मिळाल्याचे सांगितले. रमेश पवार यांनी हृद्यस्पर्शी भावना व्यक्त करताना माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांच्या कार्याचा उल्लेख करीत आपल्या राजकीय कारकिर्दीत बाजार समितीच्या सभापती पदाच्या काळात काही स्वकीयांनी तालुक्यात उठविलेल्या वावड्यांचा समाचार घेतला, स्वगृही परतताना आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी रमेश पवार यांच्या सोबत वडगाव घेनंद ,पाईट ,व खेड तालुक्यातील विविध नारायणराव पवार समर्थक कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संखेने राष्ट्रवादित प्रवेश केला.
नुसती भर पडली :
खेड तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांचे सुपुत्र रमेश पवार यांच्या मागे कुठलीही कार्यकर्त्यांची ताकद नाही ,सर्व कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षातच आहेत. त्यामुळे रमेश पवार यांच्या जाण्याने तालुका कॉंग्रेस मध्ये कुठलाही खड्डा पडला नसून केवळ राष्ट्रावादी मध्ये भर पडली असल्याचे अनेक कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले, व माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांना मानणारा कार्यकर्ता आमदार मोहिते यांच्या सोबत जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
---------
Avinash Dudhawade , 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा