चाकणला भाजी विक्रेत्यांनी रोखला चाकण शिक्रापूर रस्ता


                                             
चाकणला भाजी विक्रेत्यांनी रोखला चाकण शिक्रापूर रस्ता 
शिवसेनेच्या पुढाकाराने आंदोलन  
चाकण :अविनाश दुधवडे  
भाजीविक्रेत्यांना कायम स्वरूपी जागा द्यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने आज  ( दि.7) चाकण मध्ये चाकण शिक्रापूर रस्त्यावर माणिक चौक येथे सायंकाळी सात साडेसहा वाजनेचे सुमारास भाजी विक्रेत्या महिलांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास हा रस्ता आडवून धरल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खेडचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी या बाबत उपाययोजनेचे आश्वासन दिल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
  जुन्या  पुणे नाशिक महामार्ग परिसरात अनेक भाजी विक्रेते व्यवसाय करत असतात. त्यांना पोलिसांकडून हटविण्यात येत असल्याच्या निषेधार्थ हा रास्तारोको करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड म्हणाले की, गोर गरीब भाजी विक्रेते पोटापाण्याच्या व्यवसायासाठी येथे आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी आणतात. त्यांना अतिक्रमण कारवाईच्या निमित्ताने हटविले जाते. मात्र स्थानिक प्रशासन त्यांना बसण्यासाठी कायम स्वरूपी जागा देत नाही . हा दुटप्पीपणा असून त्यांची सोय करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. परिसरातील विविध समस्यांसाठी त्यांनी लोकप्रतिनिधींना जबाबदार धरीत टीका केली. 
विद्यार्थी सेनेचे जिल्हा संपर्क संघटक प्रमुख रामदास धनवटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश सांडभोर , महिला आघाडीच्या विजया शिंदे,  यांनी यावेळी सांगितले की, अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान या विक्रेत्यांना वारंवार येथे बसण्यास मज्जाव केला जातो, त्यामुळे त्यांचा प्रश्न मार्गी लागावा व त्यांना बसण्यासाठी हक्काची जागा मिळावी , भाजी विक्रेत्यांना कायम स्वरूपी जागा न दिल्यास संबंधिताना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी वर्पे, भारतीय कामगार सेनेचे गणेश पऱ्हाड,चाकण शहर प्रमुख पांडुरंग (बाप्पू)गोरे उपतालुका प्रमुख लक्ष्मण जाधव, भाजपचे सुर्यकांत शिंदे, स्वामी कानपिळे ,किरण गवारे, आदींसह भाजी  विक्रेत्या महिला रतनबाई इंगळे, शांताबाई शिंदे, ताईबाई शिंदे यांनी यावेळी तीव्र भावना व्यक्त केल्या . चाकण पोलिसांनी यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

त्यांचा शोध घेणार  :
 हातगाडीवाले व रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्रेते यांच्यामुळे शहरातील वाहतुकीला नेहमीच अडथळा होतो. जुना नाशिक मार्ग,माणिक चौक,  या वर्दळीच्या ठिकाणी तर अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणेसुद्धा मुश्कील होऊन जाते. बेशिस्त वाहतूक व त्याकडे वाहतूक पोलिसांचे होणारे दुर्लक्ष या संबंधाने अनेकदा वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे काही मंडळी तक्रारी करीत असतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अतिक्रमानांवर कारवाई होत असते . याबाबत रामदास धनवटे यांनी जोरदार टीका करताना अशा तक्रारी कोणती मंडळी करतात ते शोधणार असल्याचे सांगत, येथे विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होणार असेल तर त्यांना हटावा मात्र या विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी होत नसल्याकडे लक्ष वेधले. व येथील विविध समस्यांना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरीत जळजळीत टीका केली.
----------------------------------------------Avinash Dudhawade,9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)