वडगाव ते चौफुला राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा


वडगाव ते चौफुला राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा 
नागमोडी रस्ते,धोकादायक वळणे, अवजड वाहतुकीने अपघात नित्याचे 
अवजड वाहतुकीला नियमावलीची गरज 
   

चाकण:महेंद्र दुधवडे 

चाकण भागातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव व शिक्रापूर राज्यमार्ग क्रमांक 55 वर लांब आकाराच्या कंटेनरची वाहतूक कमालीची वाढली असून, यातून
होणाऱ्या अपघातांमुळे कंटेनर वाहतुकीला काही नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेकडो जणांना या रस्त्यावरील अपघातांमधुन आपले प्राण गमवावे लागले 
आहेत. 
ट्रकसहीत साधारणत: 30 ते 40 फूट लांबीचे हे कंटेनर येथील रस्त्यांवरून आणि  महामार्गावरून दिवसभरात शेकडोंच्या संख्येने जात असतात. आपल्या ताब्यातील वाहन लांबीला अधिक आहे,
याचा थोडाही विचार न करता कंटेनरचालक बेदरकारपणे वाहन चालवित असल्याचे असंख्य अनुभव आजवर पादचारी व अन्य वाहनचालकांना आले आहेत.
उंचीला ट्रकसह 19 फूट व लांबीला 30 फूट अशा कंटेनरमधील बॉक्समधून विविध प्रकारच्या मालाची वाहतूक केली जाते. किमती मालवाहतूक सुरक्षित व निर्धोक व्हावी, या हेतूने 
कंटेनर बॉक्सचा वापर केला जातो. मात्र माल सुरक्षित नेण्याच्या प्रयत्नांत पादचारी व वाहनचालकांना या कंटेनरचा आता मोठा फटका बसू लागला आहे.
कंटेनरची लांबी आणि उंची  महामार्गावरून धावणाऱ्या सर्व वाहनांमध्ये अधिक असली तरीही कंटेनरचा वेग भरधाव असतो. महामार्गावरील धोकादायक क्षेत्रात 
भरधाव कंटेनरवर नियंत्रण राखण्यात अपयश आल्याने आजवर अनेक अपघात घडले आहेत.
शिक्रापूर रस्त्यावर भीमा-भामा नद्यांच्या संगमाजवळ साबळेवाडी घट रस्त्यावर अवघड वळणावर आणि तळेगाव(ता.मावळ) कडे जाणाऱ्या नागमोडी वळणांच्या रस्त्यावर भरधाव वेगाने 
येणाऱ्या वाहनांचे अपघात नित्याचे झाले आहेत. रात्रीच्या वेळी कंटेनरचालकाने रस्त्यालागत  उभे करण्यात येत असल्याने  पहाटेच्या वेळी भरधाव वाहने दुचाकीस्वार अशा वाहनांवर 
आदळून अपघात घडतात .अशा अपघातांना सर्वस्वी अवजड वाहन चालक व कंटेनरचालकच जबाबदार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
चाकण तळेगाव चौकात सकाळी आणि सायंकाळी नागरिकांची मोठी वर्दळ असते.अशा भागातून वेगाने अवजड वाहने वाहतूक करीत असतात.  अशा धोकादायक कंटेनरवर वाहतुकीसाठी
नियमावली तयार करून बेदरकार कंटेनर चालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी केली आहे. येथील अनेक धोकादायक वळणावर आठवडय़ातून दोन तीन 
अपघात तरी नित्याचे झाले आहेत. वडगाव ते चौफुला राज्य महामार्ग क्रमांक 55 चे काम या सर्व बाबींचा विचार करून मार्गी लागल्यास अपघातांचा हा उंचावता आलेख कमी होईल अशी अपेक्षा 
व्यक्त होत असून  या साठी उपाय योजना होण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
-------------------------------------Avinash Dudhawade 9922457475 
------------------
आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)