फोक्‍स वॅगन कंपनीच्या बाथरूम मध्ये गळा कापलेल्या अवस्थेत कामगार


फोक्‍स वॅगन कंपनीच्या बाथरूम मध्ये गळा कापलेल्या अवस्थेत कामगार 
उपचारांदरम्यान मृत्यू ;घातपाताचा संशय  
चाकण: 
चाकण औद्योगिक क्षेत्रातील फोक्‍स वॅगन कंपनीतील स्वच्छता गृहात कामगाराचा गळा कापून मृत्यू झाल्याचा प्रकार आज (दि.14) दुपारी साडेबारा वाजनेचे सुमारास घडला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.या संपूर्ण घटनेमागचे नेमके गूढ मात्र रात्री उशिरा पर्यंत पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही.
गोविंद किसन बांगेवाड (वय 28, सध्या रा.नंदनवन सोसायटी चिखली, मूळ रा.धानोरा ता.ह्तगाव ,जि.नांदेड) असे या घटनेत मृत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार गोविंद आज सकाळी नेहमी प्रमाणे कामावर आला होता. दुपारी सव्वा बारा वाजनेचे सुमारास तो कंपनीच्या स्वच्छता गुहात गेला होता.त्यानंतर काही वेळाने स्वच्छता गृहात गेलेल्या अन्य कामगारांना स्वच्छता गृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गोविंद दिसला व हा प्रकार उघडकीस आला. गोविंदला तातडीने चिंचवड येथील धनश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले ,मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. गोविंद चा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण (वाय सी एम) रुग्णालयात पाठविण्यात आला असून अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस करीत आहेत.  चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. या धक्कादायक प्रकाराने  औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अफवांना उधान आले आहे. चाकण पोलिसांचे पथक रात्री उशिरा घटनास्थळी पोहचेले आहे.
------------------------------------------------------Avinash Dudhawade ,9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)