चाकणची 'घोकंपट्टी' जिल्ह्यात प्रथम


चाकणची 'घोकंपट्टी' जिल्ह्यात प्रथम 
आंतरशालेय नाट्य स्पर्धेत सादर केली उत्कृष्ट कला 
चाकण: वार्ताहर -
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्य स्पर्धेत चाकण च्या शिवाजी विद्यालयाच्या घोकंपट्टी या एकांकिकेचा माध्यमिक मुलींच्या गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला.राणी लक्ष्मीबाई विद्यालय कासार आंबोली येथे येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण 65 विद्यालयांच्या एकांकिका सदर झाल्या. यामध्ये चाकण च्या श्री.शिवाजी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थीनिनी घोकंपट्टी हि एकांकिका सादर केली. या उत्कृशात्ब एकांकिकेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. या एकांकिकेचे दिग्दर्शन व संगीत कु.संध्या सहाने ,प्रकाश योजना कु.अनिकेत नायकवाडी,नेपथ्य कु.सुहास कांडगे,व कु.अश्विनी राऊत ,लेखन दीपक माडेकर, यांनी केले. या मध्ये कु. स्वप्नाली टोके, गौरी गोरे,ऋतुजा वाघ, रोशनी घायाळ,प्रतिभा कदम, या सर्व विद्यार्थीनिनी अप्रतिम कला सादर केली. यासाठी प्रशालेचे प्राचार्य लालासाहेब भुजबळ,उपप्राचार्य मार्तंड खोडदे , पर्यवेक्षक शिवाजी वाळे, अरुण देशमुख,सुभाष गारगोटे,किशोर गोरे,या सर्वांनी सहकार्य केले अशी माहिती प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेंद्र खरमाटे यांनी दिली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे चाकण परिसरातून कौतुक होत आहे.
------------
 Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)