खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश दुधवडे



खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश दुधवडे 
मनसेच्या वतीने जाहीर सत्कार  

राजगुरुनगर : 

खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविनाश लक्ष्मण दुधवडे यांची तर उपाध्यक्ष पदी रामचंद्र सोनवणे व एम.डी.पाखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे यांच्या अध्यक्षतेखाली खेड पंचायत समितीच्या विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या .चाकण परिसराला प्रथमच पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे.खेड तालुका पत्रकार संघाची निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे - अध्यक्ष -अविनाश लक्ष्मण दुधवडे (दै.पुढारी),उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे(जनहिंदोळा,पुण्यनगरी) व एम.डी.पाखरे (प्रभात ,सामना ) कार्याध्यक्ष -तुकाराम बोंबले(दै.सामना ,पुढारी), सचिव- संजय शेटे( दै. लोकमत) ,सहसचिव -सुनील थिगळे (दै. प्रभात),खजिनदार - सुनील बटवाल (दै.प्रभात),यांची निवड करण्यात आली असून ,कायदेशीर सल्लागार पदी एड.विलास काटे(दै.सकाळ),यांची निवड करण्यात आली आहे.तर सल्लागार म्हणून पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर(दै.लोकसत्ता),कोंडीभाऊ पाचारणे( दै.पुढारी),एकनाथ सांडभोर (दै.सकाळ),विद्याधर साळवी(दै.लोकमत) यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार संघाचे सदस्य व जेष्ठ पत्रकार शिवाजी आतकरी,दत्ता भालेराव,किशोर भगत,बाळासाहेब सांडभोर,निवृत्ती नाईकरे,अतुल काळे,नाजीम इनामदार,दशरथ खाडे,सदाशिव अमराळे ,सुनील ओव्हाळ ,ए.पी.शेख,वनिता कोरे,राजेंद्र लोथे,संजय बोथरा ,रवी साकोरे,संदीप मिरजे,महेंद्र शिंदे,इसाक मुलानी,रुपेश बुट्टे,राजेंद्र मांजरे,कुंडलिक वाळूंज,किरण खुडे,कमल दुंडे,भागवत पेठकर,कल्पेश भोई,अशोक टिळेकर,कुमार नवरे,संजय बोटकर,उपस्थित आदी उपस्थित होते.पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणांर असल्याचे सांगून सर्व पत्रकारांनी एकसंध राहावे असे आवाहन नूतन अध्यक्ष दुधवडे यांनी केले.श्री.दुधवडे यांचा सत्कार राजगुरू नगर बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आणि पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक माजी अध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे यांनी केले,आभार माजी सचिव दत्ता भालेराव यांनी मानले. 
------------ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)