महा-ई-सेवा केंद्राचा लाभ घ्या : निंबाळकर
चाकण:
महा-ई-सेवा केंद्रामार्फत नागरिकास सात-बारा आणि "आठ अ'चा उतारा दिला जाणार आहे. महा-ई-सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सात-बारा आणि आठ अ उताऱ्याची सत्यता पडताळणी संकेतस्थळावरही करता येणार आहे. या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खेड चे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी चाकण येथे केले.
माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने जनतेला विविध शासकीय सेवा जलदगतीने उपलब्ध व्हावी यासाठी महा-ई-सेवा ही योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात येणार
असल्याचे सांगण्यात येत होते. आता हि योजना प्रत्यक्षात आली आहे. प्रत्येक सहा गावांकरिता एक या प्रमाणाने राज्यात 11 हजार 818 महा-ई-सेवा केंद्रे सुरू करण्याची
कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. चाकण मधील लोकसंखेच्या पार्श्वभूमीवर येथील कोहिनूर सेंटर मध्ये आणखी एका महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन तहसीलदार निंबाळकर यांच्या हस्ते करण्या आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सोमवंशी , अमोल नरुटे, गणेश शिंगटे आदी उपस्थित होते.
------------
फोटो मेल करीत आहे.
चाकण येथील महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करताना तहसीलदार निंबाळकर व अन्य (छाया: अविनाश दुधवडे, चाकण)
----------------------------------------------------------Avinash Dudhawade 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा