चाकण मध्ये तब्बल तीन हजार बोगस नळ कनेक्शन???
चाकण मध्ये तब्बल तीन हजार बोगस नळ कनेक्शन??? चाकण: अविनाश दुधवडे चाकण शहरात गेल्या काही वर्षांपासून पाणी पुरवठ्याचा विषय ऐरणीवर आला आहे. अनियमित ,कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याने आणि बऱ्याचदा दोन-दोन दिवस कोरड्या ठणठणीत राहणाऱ्या नळांच्या तोट्यांनी अनेकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. चाकण ग्रामपंचायतीच्या अनेक ग्रामसभा पाण्याच्या मुद्द्यावर वादळी ठरल्याचे सर्वश्रुत आहेच. यासाठी अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी शहरातील मोठ्या आकारांची बोगस नळ कनेक्शनही जबाबदार आहेत. शहरातील विविध भागात तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक बोगस नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब उघडकीस येत आहे. चाकण शहरातील एकता नगर,कांडगे वस्ती ,मार्केटयार्ड परिसर,शिक्षक कॉलीनी ,आगरवाडी,पठारवाडी,राक्षेवाडी ,आंबेडकरनगर, खंडोबामाळ, बलुत आळी, बाजारपेठ, देशमुखआळी,भुजबळ आळी ,माणिक चौक , राणूबाई मळा ,दावडमळा ,झित्राई मळा , आंबेठाण चौक परिसर आदी चाकण मधील सर्व सहा वार्डांच्या टापूत ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यात राणूबाईमळा व झित्राई मळा परिसरात चाकण औद्योगिक वसाहत व महाराष्ट्न जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात आले