माथाडी संघटनांच्या ओझ्याखालीची घुसमट सुरूच...
माथाडी संघटनांच्या ओझ्याखालीची घुसमट सुरूच... चाकण: राजकीय पार्श्वभूमी असलेल्या , राजकीय नेत्यांशी संबंधित असणार्या माथाडी आणि कामगार संघटना औद्योगिक क्षेत्रात आहेत. औद्योगिक भागात ऑल इज वेल चे चित्र वरवर भासविण्यात येत असले तरीही या कारवाया सुरूच असून अशा कारवायांना प्रशासनापासून स्थानिक गुंड व अनेक बड्या राजकारण्यांचे अर्थपूर्ण पाठबळ आहे.अनेक ठेक्यांमध्ये त्यांचीच भागीदारी असल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा उग्र रूप घेवू लागला आहे. सोमवारी (दि. २७) चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये काही संघटनांचे प्रतिनिधी दादागिरी करीत आमची माथाडी संघटना घ्या असे धमकावीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण एमआयडीसीतील सोन्याच्या धुराने अनेकांचे डोळे दिपले आणि या भागाला निरनिराळ्या समस्यांसह अशांततेचे ग्रहण लागले. माथाडी संघटनांच्या उपद्रवाने अद्यापही पाठ सोडली नसल्याची तक्रार वारंवार होत आहे. विविध संघटनांच्या नावाखाली कंपन्यांमध्ये हे दादा लोक प्रवेश करतात. काही संघटना पहिल्यांदा कामगारांना माथाडींना ताब्यात घेता