१५७ जणांची राहत्या घरातून धूम

चाकण मधून सरत्या वर्षात १५७ जणांची राहत्या घराला सोडचिठ्ठी
महिन्याला सरासरी १३ जन होताहेत बेपत्ता

चाकण: 
  औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज येणाऱ्या शेकडो जणांना आपल्यात सामावून घेत त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करणाऱ्या चाकण सारख्या भागात हरविले जाणाऱ्यांची संख्या धक्कादायक आहे. शहरातून महिन्याकाठी सरासरी १३ जण बेपत्ता होत आहेत. सरत्या २०१३ या वर्षात आजार,कर्जे ,निराशा ,प्रेमसंबंधातून,कौटुंबिक आणि अन्य कारणांनी आतापर्यंत एकूण १५७ जन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. बेपात्तांपैकी बहुतांश मंडळीनी स्वतः हून राहत्या घराला सोडचिठ्ठी दिल्याचेही पोलीस तपासात पुढे येत आहे. सबळ कारणाशिवाय घरातून धूम ठोकणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे यातील काही बेपत्ता मंडळी परतली असली तरी अनेक जन पोलिसांच्या रेकॉर्ड वर बेपत्ताच आहेत. 
  रोजगाराच्या निमित्ताने दररोज या भागात थडकणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढय़ांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर येथून गायब होणाऱ्याम्हणजेच बेपत्ता होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.  चाकण व लगतच्या खराबवाडी ,नाणेकरवाडी मेदनकरवाडी , कुरुळी ,निघोजेसावरदरीशिंदेवसुली,  महाळुंगेखालुंब्रे, शिंदेवासुली,  बिरदवडीआंबेठाणचिंबळी आदी ठिकाणी वाढलेल्या लोकवस्तीतून बेपत्तांच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. पोलिस डायरीत हरविल्याची नोंद करण्यात येत असली तरी या व्यक्ती बेपत्ता असण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात कुणाचे अपहरणकुणी घरगुती भांडणातून घर सोडूनतर काही वेडसरपणात घरून निघून जातात. प्रेमप्रकरणातून युवक- युवती बेपत्ता होण्याची संख्या सर्वाधिक आहे. एक-दोन दिवस परत न आल्यास कुटुंबीय तक्रार नोंदवितात. बाहेर राहिल्यानंतर अनेकजण परतही येतात. याची माहिती मात्र पोलिसांना दिली जात नाही. त्यामुळे पोलिसांवर बेपत्ता तक्रारींचा ताण कायम राहतो. सरत्या वर्षात १३  वर्षांचा शाळकरी विद्यार्थी बेपत्ता होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह एका गटारात मिळून आल्याची व अन्य एका घटनेत मायलेक बेपत्ता होऊन त्यांचा अंधश्रद्धेतून पैशांचा पाउस पडण्यासाठी नरबळी देण्यात आल्याच्या मन हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत.
  अपहरणातून बेपत्ता झाल्यास तातडीने शोध लागतो. मात्रवेडसरपणात निघून गेलेल्यांचा पत्ताच लागत नाही. घर सोडून जाणाऱ्या अनेकांकडे खिशात फारशी रक्कमही नसते. त्यामुळे ते रेल्वेने मोफत प्रवास करतात. चाकण पासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पुण्या सारख्या शहरातून परराज्यात जाणाऱ्या रेल्वेगाड्या असल्याने बेपत्ता व्यक्ती अशाच मोठ्या शहरात जात असल्याचेही आढळून आले आहे. विशेष म्हणजेगेल्या वर्षभरात हरविलेल्या व्यक्तींमधील बहुतांश महिला युवती व चाळिशीच्या आतील इसम आहेत.यात अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश मोठा आहे. पत्ता चुकणेमानसिक संतुलन बिघडणेरागावून घर सोडणेफसवून दुसरीकडे नेणे आदी कारणे त्यामागे आहेत. तर अल्पवयीन मुला-मुलींना फूस लावून पळवून नेणेअपहण करणे आदी कारणांचाही त्यात समावेश आहे. प्रेमप्रकरणात मुले घर सोडून जाण्याचे प्रमाणही अधिक आहे.. या भागात बेपत्तांमध्ये मुलीमहिलांची संख्याही लक्षणीय आहे.  राहत्या घरातून बेपत्ता होऊन स्वतःचा जीव घेत २५ जणांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने ही चितेची बाब बनली आहे. बेपत्ता महिलांचे घराजवळच विहिरीत मृतदेह सापडत आहेत. सासरच्या छळाला कंटाळून त्या बेपत्ता होऊन आत्महत्या करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होत आहे. रासे (ता. खेड) येथील पन्नास वर्षीय इसमाने अनैतिक संबंधात आडकाठी आणणाऱ्या पत्नीचा छळ करून तिला प्रेयसीच्या मदतीने आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चाकण पोलिसांत याच महिन्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनेक युवती आणि चक्क विवाहित महिलांनाही लग्नाचे आमिष दाखवूनफूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही घडत आहेत. चारित्र्यावर संशयमाहेरून पैसे आणावेतमूल होत नाही म्हणून छळलग्नात मानपान दिला नाहीया कारणावरून सर्रास विवाहित महिलांचा छळ सुरू आहे. काही महिला छळाला कंटाळून आत्महत्या करीत आहेततर काही महिला घरातून बेपत्ता होत असून  त्यांचा आजपर्यंत नातेवाईकांसह पोलिसांनाही सुगावा लागलेला नाही. अपहरणातून बेपत्ता झालेल्यांचा तातडीने शोध घेतला जातो . मात्रहटवादी भूमिकाप्रेमसंबंध ,वेडसरपणात निघून गेलेल्यांचा थांगपत्ताच लागत नाही.
--------------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)