हा महामानव झिजला नसता, तर आमचा देह सजला नसता...

हा महामानव झिजला नसतातर आमचा देह सजला नसता...
बाबासाहेबांच्या प्रतिमेला सर्व पक्षियांचे अभिवादन...

चाकण:   
हा महामानव झिजला नसतातर आमचा देह सजला नसता’.. अशा आदरयुक्त भावना व्यक्त करीत तमाम आंबेडकरी जनतेसह विविध पक्ष सामाजिक संघटना यांचे कडून महामानवभारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्ताने चाकण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस आज (दि.६) अभिवादन करण्यात आले.
 अभिवादन करण्यासाठी सर्वप्रथम पुणे जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कालिदास वाडेकर महिला जिल्हाध्यक्षा वंदना सातपुते महिला तालुकाध्यक्षा नंदा कडकमलताई गोतारणेजिल्हा कॉंग्रेस कमिटीचे काळूराम कडजमीर काझीयुवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अतिश मांजरेकुणाल कड,अनिल मिसरडॉ.प्रज्ञा भवारीआनंद गायकवाडरिपब्लिकन पक्षाचे बबनराव जाधवअशोक गोतारणे,  संतोष जाधवसुनील गोतारणे,  नितीन जगतापशांताराम गायकवाडराहुल गोतारणे,  राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष  शेखर घोगरेभारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण दुधवडे सिद्धार्थ गोतारणे  गौतम वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कालिदास वाडेकर म्हणाले कि बाबासाहेबांचे विचार  प्रेरणादायी असल्याने त्याच्या विचारांचेआचारांचे सर्वांनी पालन करावे.  डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला जिल्हापरिषद सदस्य सुरेश गोरेसरपंच दतात्रेय बिरदवडेपंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी आदींसह विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनीही दिवसभरात येथे अभिवादन केले. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. गौतम वाव्हळ यांनी प्रास्ताविक केले तर अशोक गोतारणे यांनी आभार मानले.
--------

अविनाश दुधवडेचाकण 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)