कुरुळीत श्रामणेर शिबिरास सुरुवात

कुरुळीत श्रामणेर शिबिरास सुरुवात 

चाकण : 
 खेड तालुका भारतीय बौद्ध महासभा आयोजित १० दिवसीय धम्मसंस्कार श्रामणेर शिबिरास कुरुळी (ता.खेड,जि पुणे) येथील  बुद्धविहारात मंगळवारी सुरुवात झाली. शिबिराची सुरुवात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.  यावेळी सहभागी  शिबिरार्थींना पंचशीलत्रिशरण देऊन भंतेंनी श्रामणेर दीक्षा दिली. हे शिबीर जेष्ठ भंतेंजींच्या मार्गदर्शनाखाली पुढील दहा दिवस चालणार असून यामध्ये धम्मतत्त्वज्ञानधम्म याविषयी माहिती देण्यात येणार आहे. यावेळी महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी)  यांनी बोलताना सांगितले कीया शिबिराच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानातून भविष्यात चांगले उपासक होऊन धम्मप्रचार प्रसार होईलतसेच प्रत्येकाने सर्वस्वाचा त्याग करून दुःखमुक्तीच्या मार्गाने शिबिरात ज्ञान मिळवावे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महासभेचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाडतालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी)  सिद्धार्थ (बाप्पू) गोतारणेजिल्हा संघटक पी के. पवारआर.डी.गायकवाडविशाल गायकवाड,  राजेंद्र भोसले,   आर.डी. गायकवाडविशाल गायकवाड आनंदराव कांबळे, शुभांगी कांबळे, राजेंद्र भोसले ,  निखिल नवरे,विजय भवारकिरण तुळवे आदी धम्मसेवक प्रयत्न करीत आहेत . यंदाच्या शिबिरात पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपशिक्षणाधिकारी अशोक कडलकराष्ट्र्पती पुरस्कार विजिते आदर्श शिक्षक गौतम कांबळे आदींसह तीस जन सहभागी झाले आहेत. पुढील दहा दिवस खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये सामुहिक धम्मवंदना व महापुरुषांचे प्रतिमा पुजन पंचशील व  विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आलेले असून या मध्ये  तमाम बौद्ध महिला व पुरुष सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गायकवाड यांनी केले. तर आभार सिद्धार्थ गोतारणे यांनी मानले. नवचैतन मित्रमंडळच्या वतीने शिबिरार्थींना मदत करण्यात येत आहे.
----------------

अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)