चाकणच्या महिंद्रा व्हेइकल कंपनीत पुन्हा तणाव
चाकणच्या महिंद्रा व्हेइकल कंपनीत पुन्हा तणाव
कामगारांनी केले काम बंद
चाकण:
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात चाकण येथील महिंद्रा व्हेइकल कंपनीमध्ये महिंद्र व्यवस्थापन व अंतर्गत कामगार युनियन यांच्या मध्ये साडेतीन वर्षांचा वेतन वाढ विषयक करार संपन्न होऊनही त्या प्रमाणे वेतन न मिळाल्याने कामगारांनी आज (दि.७) अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. व्यवस्थापनाने पोलीस बळाचा वापर करीत कामगारांना दडपण्याचा प्रयत्न केला असता कामगारांनी सायंकाळी थेट कंपनीतून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला. यावेळी पोलिसां कडून झालेल्या धक्काबुक्की आणि रेटारेटीत काही कामगार जखमी झाल्याचे कामगारांनी सांगितले .तर पोलिसांनी मात्र कामगार जखमी झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले असून कामगारच जबरदस्तीने काम बंद करून बाहेर पडल्याचे सांगितले.
या बाबत कामगारांनी दिलेल्या माहिती नुसार महिंद्र व्यवस्थापन व अंतर्गत कामगार युनियन यांच्या मध्ये साडेतीन वर्षांचा वेतन वाढ विषयक करार नुकताच संपन्न झाला होता . या वेतनकरारामुळे साडेतीन वर्षांकरिता सरासरी पगारवाढ ८ हजार ६०० रुपये होणार होती. कामगारांचे प्रथम वर्षाकरिता कमीतकमी पगार १९ हजार २३३ रुपयांपासून अधिकतम पगार २५ हजार ९०६ पर्यंत होणार होते. कामगारांना मिळालेली हि पगारवाढ कमीतकमी रु. ७ हजार ६५२ पासून अधिकतम पगारवाढ १३ हजार ५८ पर्यंत होती. त्यासाठी उत्पादकता वाढ १० टक्के ठरविण्यात आली होती. सदर करारनाम्यास अंतर्गत कामगार युनियनचे अध्यक्ष सागर भोसले,जनरल सेक्रेटरी सचिन धापटे व इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व व्यवस्थापनाच्या वतीने विजय धोंगडे (सि. इ. ओ.), श्री. विजय नायर, श्री. महेश करंदीकर, उदयसिंह खरात व इतर अधिकारी यांची मान्यता मिळाली होती, व करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. प्रत्यक्षात कामगारांना या महिन्यात पगारवाढ मात्र मिळालीच नाही. मुळातच या वेतनवाढ करारा बाबत कामगारांमध्ये अस्वस्थता होती. त्यातच झालेली पगारवाढ सुद्धा कामगारांना या महिन्याच्या पगारात मिळालीच नाही . त्यातच कामगारांना निलंबित करण्याचा सपाटा व्यवस्थापनाने लावला होता. त्यामुळे कामगारांनी आज कामच बंद करून संताप व्यक्त केला. त्यावर व्यवस्थापनाने पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता कंपनीत गोंधळ उडाला. या बाबत रात्री उशिरा पर्यंत महिंद्रा कंपनीच्या आवारात व प्रवेशद्वारावर गोंधळ सुरु होता. दरम्यान मागील आठवड्यातच एका कामगाराला निलंबनाची नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शिवीगाळ दमदाटी करीत कामगारांना घेवून जाणाऱ्या बसवर तुफान दगडफेक केल्याच्या आरोपाखाली महिंद्रा कंपनीतून निलंबित करण्यात आलेला कामगार अमोल गीते याच्यासह साठ कामगारांवर ३० नोव्हेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या संपूर्ण प्रकाराबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.
कामगार दहशतीखाली:
गेल्या दहा -बारा वर्षात वाहन उद्योगाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीत कामगार त्यांच्या संघटना आणि व्यस्थापन-उद्योजक यांच्यातील संघर्ष वारंवार समोर येवू लागले असून औद्योगिक अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे . येथील विविध बहुराष्ट्रीय बड्या कंपन्यांमध्ये व लहान कंपन्यांमध्ये कामगारांनी आंदोलनाचे हत्यार आपल्या न्याय मागण्यांसाठी उपसल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यातच महिंद्रा सारख्या बड्या मलाईदार कंपन्यांमध्ये लगतच्या तालुक्यातील गुंडगिरीचा मोठा शिरकाव झाला आहे. संबंधितांच्या दह्शातीखालीच कामगारांना काम करावे लागत असल्याचे धक्कदायक वास्तव आहे.
कामगारांचे आरोप चुकीचे : विजय नायर (महिंद्रा व्हेईकल कंपनी,चाकण )
कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी विजय नायर यांनी सांगितले कि , कंपनीत कुठल्याही कामगाराला मारहाण झालेली नाही. वेतनवाढ करारा प्रमाणे अधिकीचा पगार हा उत्पादनाशी निगडीत असताना व कामगारांनी त्या पद्धतीने उत्पादन दिलेले नसताना त्यांना करारा प्रमाणे पगार देण्याचा प्रश्नच येत नाही. कंपनीतील १ हजार कायम कामगारांपैकी केवळ आडमुठी भूमिका घेणारे सहाशे ते सातशे कामगार बाहेर असून अन्य कामगार उत्पादन देत आहेत. कामगारांकडून करण्यात येणारे सर्व आरोप धादांत चुकीचे आहेत.
---------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
Avinash Dudhawade,chakan 9922457475
मला वेळ द्या
उत्तर द्याहटवा