चाकण मध्ये चोऱ्या व गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्हीची गरज
वाहतुकीला शिस्ती साठीही उपयोग
असामाजिक प्रवृत्तींचे बुरखे फाडण्यासाठी उपयोग
चाकण: अविनाश दुधवडे
चाकण भागात गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगीकरण सुसाट वेगाने वाढल्या नंतर परराज्यातून येथे रोजगाराच्या नावाखाली आलेल्या लोकसंखेच्या लोंढ्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी मंडळी बस्तान बसवीत आहेत, त्यांच्या कडून निरनिराळ्या चुकीच्या व्यवसाया सोबतच याभागात घातक शस्त्रे व गावठी कट्टे पुरवीले जात असल्याची ,पाळत ठेवून लुटमार-जबरी चोऱ्या ,वाहन चोऱ्या होत असल्याची वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. स्वतःची ओळख लपवून दहशतवाद्यांच्या स्लिपर सेल प्रमाणे कार्यरत असणाऱ्या समज कंटकाचा हा स्लिपर सेल शोधून काढणे आवश्यक झाले आहे, त्यासाठी चाकणच्या विविध भागात आता वाढत्या गुन्हेगारी कारवाया व संशयित व्यक्तींचे बुरखे टराटरा फाडण्यासाठी 'सीसीटीव्ही'यंत्रणेच्या तिसऱ्या डोळ्याचा वॉच ठेवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
चाकण या औद्योगिक नगरी मध्ये राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनाने रोजगाराच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्याच प्रमाणे निरनिराळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्याचे लोंढे आले. खरोखर गरजूंनी चाकण च्या औद्योगिक क्षेत्रातिल कारखान्यांमध्ये रोजगार मिळविला व आपल्या उपजीविकेचे माध्यम निर्माण केले. कारखानदारांचीही कुशल अकुशल कामगारांची गरज पूर्ण झाली.मात्र याच कामगारांच्या आडून राज्यासह परराज्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी मंडळीही याभागात वास्तव्यास आली. त्यातील अनेकांनी येथे अशीच गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या मंडळींशी सलगी करून याभागाची संपूर्ण माहिती करून घेऊन चोऱ्यामाऱ्या व चोरीच्या भंगार मालांच्या खरेदी विक्रीत बस्तान बसविले आहे. परराज्यातून आलेल्या अशा काही ठराविक असामाजिक प्रवृत्तीचा तांडव येथेच संपत नाही .वाहन चोऱ्या व अन्य काही घटनांमध्ये परप्रांतीयांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पोलिसांना दहशतवाद्यांच्या स्लिपर सेल प्रमाणे याभागात बेमालूम पणे वावरणाऱ्या या प्रवृत्तींचा थांगपत्ता पत्ता अजून पर्यंत तरी लागलेला नाही. औद्योगिक विस्ताराने याभागातील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे अपघातांची अखंडित मालिकाही सुरु झाली आहे.अनेक बेदरकार वाहन चालक अपघातानंतर तसेच पुढे निघून गेल्याचे आणि जखमींना प्राणाला मुकावे लागल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत.सीसीटीव्ही मुळे अशा अपघातानंतर पळून जाणार्या वाहन चालकांचा शोध घेणेही शक्य होणार आहे. चाकण च्या माणिक चौक भागात गळ्यातील दागिने,मोबाईल चोरटेही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत,त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही त्यांचेही चेहरे सीसीटीव्हीच्या निगराणी मुळे समोर येवू शकतील.
वाढती लोकसंख्या ,अपुरे पोलीस बळ,सुरक्षा व्यवस्थेत अधिक बळकटी आणण्याच्या दृष्टीने चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था संघटना यांच्या माध्यमातून क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) बसवावेत असे अनेकदा आवाहन केले आहे. मात्र मेदनकरवाडी वगळता सीसीटीव्हीचा वापर व त्यासाठी आवश्यक बाबीं बाबत धोरणच अद्याप येथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरविलेले नाही. मेदनकर वाडी सारख्या लहान ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही साठी दहा लाखांची तरतूद केल्याने अन्य ग्रामपंचायतीनी असेच धोरण राबविण्याची मागणी सामान्य नागरिकही करू लागले आहेत. समाजकंटक ,गुन्हेगार व त्यांच्या कारवायांवर ‘नजर’ ठेवण्यासाठी चाकण सारख्या औद्योगिक दृष्ट्या विस्तारत्या शहरांमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही हाच उपाय ठरू शकणार आहे.
चाकण मधील महत्वाच्या ठिकाणांना सीसीटीव्ही कॅमेर्याच्या निगराणीखाली आणण्याचा पोलीस खात्याचा प्रयत्न असल्याचे चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी सांगितले . त्यात प्रामुख्याने पुणे नाशिक महामार्ग व माणिक चौक,तळेगाव चौक,आंबेठाण चौक, शहरातील प्रत्येक चौक व विविध मोठ्या वस्त्यांकडे जाणारे मार्ग येथे सीसीटीव्ही कॅमेर्यांची गरज आहे.त्यासाठी लागणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे.
महाविद्यालयांच्या आवारातही गरज:
कॉलेज परिसरातील टपोरीगिरी आणि गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी कॉलेज व्यवस्थापनाने "सीसीटीव्ही' यंत्रणा बसवून घ्यावी अशीही मागणी होत आहे. येथील शाळा कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचे जबरी हाणामारीचे अनेक प्रकार होत असतात. चाकण मध्ये विविध ग्रुपच्या नावाखाली विद्यार्थ्यांशी "कनेक्शन' वाढविणाऱ्या धेंडांचा शाळांच्या कॅंपस्मधील वावर तातडीने थांबविण्यासाठी व टपोरीगिरी हटविण्यासाठी तेथेही सीसीटीव्हीची गरज निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या परिस्थितीने कॉलेजकुमार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकडे आकर्षित होऊ लागले आहेत.त्याचीच रंगीत तालीम महाविद्यालयांच्या आवारात पहावयास मिळते .त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांसह कॉलेज व्यवस्थापनानेही गुन्हेगारी, टपोरीगिरीविरुद्ध सक्रिय होण्याची गरज निर्माण झाली आहे.
--------
--------Avinash Dudhawade, chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा