चाकण च्या चक्रेश्वर मंदिरात भाविकांची मांदीयाळी
चाकण: अविनाश दुधवडे
महाशिवरात्री निमित्त चाकण (ता. खेड) येथील चक्रेश्वर मंदिरात पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. आज (ता.10) सकाळपासूनच या मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी जमली होती. सायंकाळी उशिरा पर्यंत हजारो भाविकांनी येथे दर्शन घेतले.
चाकणच्या या प्राचीन चक्रेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्र असल्यामुळे मंदिराच्या परिसरातच नारळ, पुजेचे साहित्य विक्रीसाठीचे दुकाने लावण्यात आली होती. मंदिराच्या परिसरातच बेलाची पाने विक्री करण्यात येत होती. एवढेच नव्हे तर मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून रामदास धनवटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सर्वच भाविकांना साबुदाना खिचडी, व फराळाचे वाटप करण्यात आले. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. चक्रेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार राम कांडगे व मंदिराचे विश्वस्त किरण मांजरे, निवृत्ती जाधव, गोपाळ जगनाडे, यांच्या कडून भाविकांचे स्वागत करण्यात येत होते. महाशिवरात्री निमित्त देवस्थान ट्रस्टने विविध धार्मिक कार्यक्रमांसह , सप्ताहाचे आयोजन केले होते. राज्य शासनाने नुकताच या चक्रेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र विकासाचा ‘क’ दर्जा दिला असून, या मंदिरालगतच्या ओढय़ाजवळ संरक्षक भिंतीचे ,सुशोभीकरणाचे,भाविकांसाठी पाण्याच्या टाकीचे काम सुरु वेगात सुरु आहे. ----------------- Avinash Dudhawade, chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा