चाकण मधील सर्व घडामोडींवर सडेतोड भाष्य करणारा ब्लॉग
जमिनीच्या वादातून कोरेगावात विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षांचा खून
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
जमिनीच्या वादातून कोरेगावात विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षांचा खून तलवारी आणि कोयत्याने केले वीस वार ;एक हात तोडला मनगटापासून
खेड तालुक्यात खळबळ; दोघांवर खुनाचा गुन्हा चाकण:अविनाश दुधवडे
जमिनीच्या वादाच्या कारणावरून चौघांनी कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दतात्रेय नामदेव घनवट यांचा तलवारी आणि कोयत्यांनी तब्बल वीस सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगावखुर्द गावच्या हद्दीत देवताळी घाटाच्या पायथ्याशी आज (दि.14)सकाळी साडेनऊ वाजनेचे सुमारास घडला.हा हल्ला इतका भीषण होता की घनवट यांच्या संपूर्ण अंगावर खोलवर जखमा झाल्या होत्या व त्यांचा डावा हात मनगटापासून तुटून पडला होता.
या बाबतची फिर्याद घनवट यांची पत्नी मंदा दतात्रेय घनवट (वय 50,सध्या रा.औदुंबर सोसायटी,पांजरपोळ भोसरी,मूळ रा.कोरेगाव खुर्द ,ता.खेड) यांनी चाकण पोलिसांत दिली असून त्यांच्या फिर्यादी नुसार संतोष मधुकर मांजरे (रा.कोरेगावखुर्द ,ता.खेड) याच्यासह त्याच्या अन्य साथीदारांवर चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,दतात्रेय घनवट यांचा गावातील मांजरे कुटुंबियांशी जमिनीच्या कारणावरून वाद होता.या जमिनीच्या वादाची सुनावणी चार दिवसांनी (18 मार्च) होणार होती.या जमिनीच्या कारणावरून दावा मागे घ्यावा अशी धमकी देण्यात आली होती
चाकण पोलिसांनी या बाबत दिलेल्या माहिती नुसार ,दतात्रेय घनवट हे आपली पत्नी मंदा (वय 50) व मुले हेमंत(वय 30) आणि किरण(वय 28) यांच्या समवेत राहत होते.ते पिंपरीच्या टेल्को कंपनीत नोकरीस होते.गावच्या विविध कार्यकारी सोसायटीची मिटिंग असल्याने आज (दि.14)सकाळी घनवट हे आपली पत्नी मंदा यांच्या समवेत गावाकडे येत असताना कोरेगाव फाट्यापासुन पुढे आल्या नंतर गावा पासून अर्धाकिलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी आधीच पाळत ठेवून बसलेल्या संतोष मधुकर मांजरे व त्याच्या साथीदारांनी एका दुचाकीवरून येवून घनवट यांच्या दुचाकीला ( क्र.एम एच 14 बी डब्लू 4231)पाठीमागून जोरदार ठोस देवून खाली पाडले,व घनवट यांना जबर मारहाण करीत रस्त्या लगतच्या चारीत फरपटत आडबाजूला नेले,व तलवारी आणि कोयत्यांनी त्यांच्या छातीवर ,पायावर,पाठीवर,दोन्ही हातांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.घनवट यांची पत्नी मंदा यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून रस्त्यावरून जाणार्या अन्य दुचाकीस्वारांना मदतीसाठी याचना केली मात्र या थरारक घटनेमुळे कुणीही थांबले नाही.या जबर मारहाणीत घनवट यांच्या अंगावर अनेक खोल जखमा झाल्या होत्या व त्यांचा डावा हात मनगटापासून तुटून खाली पडला होता.त्यानंतर हल्ले खोरांनी घटना स्थळावरून पोबारा केला.या घटनेची माहिती अर्ध्या तासाने गावात समजल्या नंतर बाजार समितीचे संचालक कैलास गाळव ,यांच्या सह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घनवट यांना चाकण येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
चाकण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम,उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.घनवट यांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी संतोष मांजरे व त्याचे साथीदार असलेले राजगुरुनगर मधील काही संशयित फरार झाले असल्याने त्यांच्या नातेवाईकांना अटक करण्याची मागणी चाकण पोलिसांकडे केली,मात्र यातील सर्व दोषींना तातडीने गजाआड करण्याचे आश्वासन चाकण पोलिस ठाण्याचे एस.पी.येडे,मधुकर थोरात,अनंता शिंदे,नंदकुमार चव्हाण यांनी दिल्याने तणाव निवळला.दरम्यान चाकण पोलिसांचे पथक संशयितांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असून चाकण चे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्ग दर्शनाखाली एस.पी.येडे,मधुकर थोरात,अनंता शिंदे व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान या भागात शासनाच्या विविध विकास प्रकल्पांमुळे जमिनींना आलेल्या सोन्याच्या मोलाने जागेच्या वादातून एकमेकांचे गळे घोटण्याचे थरारक प्रकार वारंवार समोर येवू लागले आहेत.कोरेगावच्या या घटनेत गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित काही गुंडांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
-------
Avinash Dudhawade,chakan 9922457475
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे) श निवार वाडा,पुणे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण : पुणे पुणे जिल्ह्यातील तालुके : चौदा पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ : १५,६४३ चौ.कि.मी. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या : ५५,३२,५३२ हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला. समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात. गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यां
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा