चाकणला दररोज हजारो लिटर पाणी गळती 
इतरत्र दुष्काळ ;चाकणला मात्र पाणी गळती 
बड्या गृहप्रकल्पांनाही चोरून पाणी 

चाकण:अविनाश दुधवडे  
 
 राज्यासह खुद्द खेड तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येने भंडावून  सोडले असताना एमजेपी व सीआयए यांच्या ढिसाळ कारभारा मुळे जलवाहिन्यांच्या गळतीतून दररोज हजारो लिटर पाणी गळती होत आहे. 
  चाकण औद्योगिक क्षेत्र व लगतच्या एकोणीस गावांसाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ( एमजेपी ) चाकण औद्योगिक वसाहत व लगतची
एकोणीस गावे ही योजना  चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि त्यांची संघटना  चाकण इंडस्ट्रीज असोशिएशन (सीआयए) यांच्या मदतीने पूर्णत्वास आणली खरी मात्र 
योग्य नियोजन आणि देखभाल दुरुस्ती अभावी या योजनेच्या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती असून संबंधित विभाग दुष्काळी परिस्थितीत अनेकांच्या घशाला कोरड असताना गळतीच्या या गंभीर प्रकाराबाबत डोळ्यावर कातडे ओढून घेत आहे.त्यामुळे हजारो लिटर्स पाणी या भागात दररोज वाया जात असल्याची विपर्यस्त स्थिती निर्माण झाली आहे.या योजनेच्या  देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होत असताना व सीआयए कडून एमजेपीकडून होणाऱ्या  मागणी पेक्षा अधिक पैसे गोळा केले जात असतानाही हा पैसा मुरतो कुठे, हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चाकण करांना आवश्यक असणारा अधिकीचा पाणी पुरवठा करण्यास सपशेल नकार देणाऱ्या एमजेपीने आता ठिकठिकाणी होणारी ही पाणी गळती ताबडतोब रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं त्वरीत उचलावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 
पाण्याला गळती अशीही ...
 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक मंडळींच्या सहकार्याने चाकण औद्योगिक वसाहत व लगतची एकोणीस गावे यांच्यासाठी शुद्ध 
पाणीपुरवठा व्हावा याकरिता भामा-आसखेड धरण जलाशयातून नवीन प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तयार केली. चाकण औद्योगिक क्षेत्र व लगतच्या एकोणीस गावांसाठी 
पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अनेक वर्षे रेंगाळलेली प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बहुतांश भागांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम होण्यापूर्वीच 
कारखानदार कामगार यांच्या आग्रहास्तव कार्यान्वित केली आहे .चाकण व लगतची भांबोली, करंजविहिरे, वराळे, आंबेठाण, शिंदे, सावरदरी, वासुली, महाळुंगे, खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, रासे, भोसे, कडाचीवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कोरेगाव खुर्द ही 19 गावे या योजनेत समाविष्ट आहेत. सध्या या योजनेच्या पाण्याला औद्योगिक क्षेत्रातून 7.09 दशलक्ष लिटर इतकी औद्योगिक क्षेत्रातून तर 6.19 दशलक्ष लिटर घरगुती ग्राहकांकडून मागणी असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्या कडून सांगितले जात आहे . यातील अनेक गावांनी हा पाण्याचा स्रोत पाणी मिळविण्यासाठी सुरुवातीलाच कराव्या लागणाऱ्या लाखो रुपयांच्या भरमसाठ खर्चाच्या व दराच्या मुद्द्यावर गरज असतानाही नाकारला आहे.मात्र याच योजनेचा पाणी पुरवठा चाकण भागातील काही बड्या नामांकित गृहप्रकल्पांना करण्यात येत असल्याची विपर्यस्त स्थिती येथे निर्माण झाली आहे . त्यामुळे परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिकांना या पाणी योजनेचा काडीचाही फायदा होत नसून बड्या गृहप्रकल्पांमध्ये राहणाऱ्या धनाढ्य मंडळींना चोवीस तास बिनबोभाट पाणी पुरवठा होत आहे.
------------
Avinash Dudhawade,chakan 9922457475  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)