‘महाड क्रांती' दिना निमित्त धम्म सहल


‘महाड क्रांती' दिना निमित्त धम्म सहल 

चाकण: 
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याला स्पर्श करून सामाजिक समतेची क्रांती केली. या ऐतिहासिक घटनेचा 86 वा वर्धापन दिन येत्या 20 मार्च रोजी महाडमध्ये साजरा करण्यात येत असून खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. . याप्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातूनतून शेकडो आंबेडकर अनुयायी हजेरी लावून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करणार असल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी) व सिद्धार्थ गोतारणे यांनी सांगितले.  ‘महाड क्रांती' दिना निमित्त काढण्यात येणाऱ्या या धम्म सहलीत आंबवडे हे बाबासाहेबांचे गाव, महाड चवदार तळे, वणंद हे माता रमाई यांचे गाव, आदी पाहण्याची संधी मिळणार आहे. Laxman dudhawade 9850917070

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)