अवकाळी पावसाने चाकणला कांद्याचे नुकसान


अवकाळी पावसाने चाकणला कांद्याचे नुकसान 
चाकण: अविनाश दुधवडे 
उन्हाच्या काहिलीने होरपळलेल्या चाकणकरांना शनिवारी (दि.१६ मार्च २०१३ )सायंकाळी साडेचार वाजनेचे सुमारास अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसाने सर्वांचीच दैना केली.आज शनिवार आठवडे बाजारामुळे चाकण मार्केट यार्डात आवक झालेल्या कांद्याचे या पावसाने मोठे नुकसान केले.मात्र सुदैवाने बराच कांदा गाड्यांमध्ये भरून पाठविण्यात आल्याने व मार्केट च्या आवारातील कांदा ताडपत्रीच्या सहायाने झाकण्यात आल्याने मोठे नुकसान टळले .मात्र आवक झालेल्या सुमारे तीस हजार क्विंटल कांद्या पैकी सुमारे दहा ते पंधरा टक्के कांदा अवकाळी पावसाने भिजल्याचे बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.
चाकण सह पंचक्रोशीतील सर्वच गावांमध्ये  पावसाच्या जोरदार सरी झाल्या असून या वादळी पावसात शेतातील कांदा पिकाचे आणि शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे  मोठे नुकसान झाल्याच्या  तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत.मार्च महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळात आता पाऊसच धावून आल्याची चर्चा सर्वत्र होत होती.आज दुपारी तीन वाजल्या पासूनच ढगांची गर्दी आकाशात जमा झाली होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास  वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली .चाकणच्या आठवडे बाजारातील विक्रेत्यांसह खरेदीदारांची या पावसाने चांगलीच दैना केली.सुमारे अर्धा तास मुसळधार बरसलेल्या या पावसाने परिसरातील सर्व रस्ते जलमय केले  होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)