१५७ जणांची राहत्या घरातून धूम
चाकण मधून सरत्या वर्षात १५७ जणांची राहत्या घराला सोडचिठ्ठी महिन्याला सरासरी १३ जन होताहेत बेपत्ता चाकण: औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज येणाऱ्या शेकडो जणांना आपल्यात सामावून घेत त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करणाऱ्या चाकण सारख्या भागात हरविले जाणाऱ्यांची संख्या धक्कादायक आहे. शहरातून महिन्याकाठी सरासरी १३ जण बेपत्ता होत आहेत. सरत्या २०१३ या वर्षात आजार , कर्जे , निराशा , प्रेमसंबंधातून , कौटुंबिक आणि अन्य कारणांनी आतापर्यंत एकूण १५७ जन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. बेपात्तांपैकी बहुतांश मंडळीनी स्वतः हून राहत्या घराला सोडचिठ्ठी दिल्याचेही पोलीस तपासात पुढे येत आहे. सबळ कारणाशिवाय घरातून धूम ठोकणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे यातील काही बेपत्ता मंडळी परतली असली तरी अनेक जन पोलिसांच्या रेकॉर्ड वर बेपत्ताच आहेत. रोजगाराच्या निमित्ताने दररोज या भागात थडकणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढय़ांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर येथून गायब होणाऱ्या , म्हणजेच बेपत्ता होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चाकण व लगतच्या खराबवाडी ,ना