
चाकणला दररोज हजारो लिटर पाणी गळती इतरत्र दुष्काळ ;चाकणला मात्र पाणी गळती बड्या गृहप्रकल्पांनाही चोरून पाणी चाकण:अविनाश दुधवडे राज्यासह खुद्द खेड तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येने भंडावून सोडले असताना एमजेपी व सीआयए यांच्या ढिसाळ कारभारा मुळे जलवाहिन्यांच्या गळतीतून दररोज हजारो लिटर पाणी गळती होत आहे. चाकण औद्योगिक क्षेत्र व लगतच्या एकोणीस गावांसाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ( एमजेपी ) चाकण औद्योगिक वसाहत व लगतची एकोणीस गावे ही योजना चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि त्यांची संघटना चाकण इंडस्ट्रीज असोशिएशन (सीआयए) यांच्या मदतीने पूर्णत्वास आणली खरी मात्र योग्य नियोजन आणि देखभाल दुरुस्ती अभावी या योजनेच्या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती असून संबंधित विभाग दुष्काळी परिस्थितीत अनेकांच्या घशाला कोरड असताना गळतीच्या या गंभीर प्रकाराबाबत डोळ्यावर कातडे ओढून घेत आहे.त्यामुळे हजारो लिटर्स पाणी या भागात दररोज वाया जात असल्याची विपर्यस्त स्थिती निर्माण झाली आहे.या योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर लाखो रु...