चाकणला मनसेचे रास्तारोको आंदोलन

चाकणला मनसेचे रास्तारोको आंदोलन

पंचवीस जणांना घेतले ताब्यात
चाकण:  
   टोलनाक्यांविरोधात रास्तारोको आंदोलनादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाल्याने चाकण परिसरातील मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत खेड तालुक्यात प्रवेश करतानाच येणारा मोशी टोलनाका चांडोली टोलनाका व तळेगाव (दाभाडे ) ते शिक्रापूर दरम्यान येणारे दोन्ही टोलनाके तात्काळ बंद करावेत अशी जोरदार मागणी करीत चाकण -शिक्रापूर हा राज्यमार्ग चाकण (ता.खेड) येथील माणिक चौकात तब्बल अर्धातास रोखून धरला.
 सकाळी आकारा वाजनेचे सुमारास मोठ्या संखेने जमलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत माणिक चौकात रास्ता रोको आंदोलन  केले. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंडलाधिकारी मोराळे यांना दिले. त्यानंतर चाकण पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मनसेचे अभय वाडेकर,योगेश आगरकर,मनोज खराबीसचिन जाधवविशाल पर्हाडसागर वाव्हळ,संतोष देशमुखहृषीकेश वाव्हळप्रणव घाटकर,प्रणव डंभीरसंकेत पाटील,संकेत पिंगळेअमोल पन्हाळेशुभम गोरे,परीक्षित पानसरे आदी सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांचा समावेश होता. मनसेच्या आंदोलनामुळे चाकण येथे वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत होऊन वाहतुकीची गती मंदावली होती. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे फार वेळासाठी कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही.
   उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले की,मनसेच्या पदाधिकाऱयांना फौजदारी दंड संहितेतील कलम १४९ नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तालुक्यात नुकत्याच झालेल्या आंदोलनात थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात होता. काही पदाधिकार्यांना अटकही करण्यात आली होती. आजच्या रास्तारोको दरम्यान तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. 
 ----------------------------
अविनाश दुधवडे ,चाकण (पत्रकार)  ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)