चाकण ग्रा.पं. कर्मचारी गोरेंचा अपघाती मृत्यू

चाकण ग्रा.पं. कर्मचारी गोरेंचा अपघाती मृत्यू
चाकण: 
 अपघातानंतर जखमींना मदत करण्याएवजी वाहनासह तसेच पुढे पळून जाण्याची बेदरकार वाहन चालकांची बळावलेली वृत्ती, आणि पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे नको म्हणून अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीची मदत करण्यास न धजावणारे वाटसरू यामुळे चाकण ग्रामपंचायतीचे सर्वात जेष्ठ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
भगवान शंकर गोरे (वय ५५,रा.चाकण ता.खेड)  असे अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोरे हे चाकण ग्रामपंचायतीच्या एका वार्डासाठी  नवीन पाईपलाईन पाहण्यासाठी गेले होते त्या वेळी हा प्रकार घडला. या बाबतचे वृत्त असे कि, भगवान गोरे हे मंगळवारी (दि.४)  चाकण ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त देहूरोड भागात दुचाकीवरून गेले होते. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाची  जबरदस्त ठोस बसून ते गंभीर जखमी झाले. त्या नंतर अपघात करणारे वाहन तसेच पुढे निघून गेले. गंभीर जखमी अवस्थेत गोरे घटनास्थळीच बराचवेळ पडून होते. त्यानंतर तब्बल तासाभराने त्यांना खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे समजते. दोन दिवस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र गुरुवारी (दि.६) त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. गोरे चाकण ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ३१ वर्षांपासून पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. आपल्या विनोदी स्वभावामुळे ते या भागात लोकप्रिय होते. 'ओके' या टोपण नावाने ते मित्र परिवारात ओळखले जात. त्यांच्या या अशा दुर्दैवी अपघाती मृत्यू मुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून चाकण ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना ५० हजारांची तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे सरपंच दतात्रेय बिरदवडे यांनी सांगितले.  गुरुवारी सायंकाळी उशिरा हजारो चाकणकर नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
------------------

 Avinash Dudhawade, chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)