जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

चाकणमधील  जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद
२८६ उत्कृष्ट प्रयोग तर २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करताना श्री.प्रतापराव खांडेभराड व सौ.नंदाताई 



चाकण: 
  पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) व राज्य विज्ञान संस्थानागपूर आणि पी. के. फाऊंडेशन संचलित पी. के. टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जानेवारी या कालावधीत चाकण येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद लाभला. या विज्ञान प्रदर्शनात २८६ हून अधिक उत्कृष्ट प्रयोग सदर करण्यात आले होते तर जिल्ह्यातील तब्बल वीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविल्याने या प्रदर्शनाला अक्षरशः एखाद्या मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
  या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे अनेक मॉडल सादर केले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फेत विज्ञान प्रदर्शन भरविले जाते. हे जिल्हास्तरीय प्रदर्शन प्रथम या भागात घेण्यात आले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी अणुभट्टीपासून सॅटेलाइटरॉकेटपर्यंतची मॉडेल्स सादर केली होते.  कोणीही थक्क व्हावंअसं हे विज्ञान प्रदर्शन येथे पहावयास मिळाले. विद्यार्थ्यांची हि कल्पकता पाहिल्यानंतर महराष्ट्र राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सहायक संचालिका सुमन शिंदेआमदार दिलीप मोहिते,  पी. के. फाऊंडेशनचे प्रतापराव खांडेभराड आदींसह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात  विज्ञानावर आधारित शेकडो विविध प्रयोगांचं सादरीकरण केले होते. यात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वैज्ञानिक प्रतिकृतीशिक्षकांचे शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा सहायकांचे साहित्यलोकसंख्या शिक्षणव्यवसाय मार्गदर्शन यावरील प्रतिकृतीसाहित्य मांडण्यात आल्या होत्या . वाढती लोकसंख्या ही अनेक समस्या घेऊन येऊ शकते. त्यामुळे लोकसंख्याला आवर घालणे गरजेचे आहे अशी शिकवण या  विज्ञान प्रदर्शनाद्वारे काही विद्यार्थ्यांनी दिली. या उपक्रमात जिल्ह्यातील तीनशे शाळांचे विदयार्थी सहभागी झाले होते. पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) व राज्य विज्ञान संस्थानागपूर आणि पी. के. फाऊंडेशन संचलित पी. के. टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
-------
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)