उद्धव ठाकरे यांनी कुठूनही निवडून येवून दाखवावे : गृहमंत्री पाटील

उद्धव ठाकरे यांनी कुठूनही निवडून येवून दाखवावे : गृहमंत्री पाटील
कडाची वाडीत आव्हान
चाकण:  
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याशी गुफ्तगू करताना अशोक खांडेभराड
  उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे डिपॉझीट जप्त करण्याचे आव्हान देण्यापूर्वी महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊन दाखवावे,'  असे खुले आव्हान राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कडाची वाडी (ता. खेड) येथे दिले . खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख यांनी दिलेल्या आव्हानाला आर.आर.पाटील यांनी येथे आपल्या स्टाईल ने उत्तर दिले. तर याच कार्यक्रमात शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी उपजिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड यांनीही  राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वर जोरदार टीका केली त्यामुळे खांडेभराड शिवसेनेच्या वाटेवर असल्याची  आणि संधीचा फायदा घेत शिवसेनेला खिंडार पडण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी चालविल्याच्या या भागात सुरु झाली आहे.
 चाकण जवळील कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  विविध विकासकामांच्या उद‍्घाटन कार्यक्रमात गृहमंत्री पाटील येथे आले होते . पुढे बोलताना आर.आर. पाटील म्हणाले किशिवसेनेत पाय धरण्यापलीकडे काहीही करता येत नाहीमंत्री आणि खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा दाखला त्यांनी यावेळी दिला व शिरूर लोकसभा मतदार संघातझालेल्या चुका सुधारण्यासाठी आणि त्यांचे डाव त्यांच्यावर उलटून लावण्यासाठी अशोकराव खांडेभराड तुम्ही मदत करा असे आवाहन केले. त्याच प्रमाणे खेड तालुक्यातील तुमच्या सहकार्यांसमवेत कार्यक्रम लावा मी स्वतः उपस्थित राहतो आणि तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असे कधीही वाटू देणार नाही असे सांगत त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले.   कडाच्या वाडीतील या कार्यक्रमामुळे खेड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.खांडेभराड २५ वर्षापासून शिवसेनेत कार्यरत होते. त्यामुळे  त्यांच्यावर झालेल्या कारवाईने निष्ठावान शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती.  निष्ठावान शिवसैनिकांवर हा अन्याय असूनत्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जबाबदार आहेतअसा आरोप स्वत: खांडेभराड व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळेच खांडेभराड यांनी आपल्याच गावात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते विकास कामांची उद्घाटने करवून घेत अनेक संकेत दिले आहेत.गे ल्या दिवसांपासून या भागात अशोक खांडेभराड यांच्या हकालपट्टी नंतर शिवसेनेत आणि त्यांच्या कडाची वाडी गावात असलेली नाराजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उफाळून आली होती .
यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील पंचायत समितीच्या सभापती कल्पना गवारीउपसभापती सुरेश शिंदेराष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव डॉ. शैलेश मोहितेशिरूर बाजार समितीचे मंगलदास बांदल खेड बाजार समितीचे सभापती विलास कातोरेजिल्हा राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष किरण मांजरेकडाची वाडीच्या सरपंच शोभा कडउपसरपंच गणेश पर्हाड आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्यजिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

तो पायंडा पडू देणार नाही:
या भागात सलग तिसऱ्यांदा कुठलाही खासदार निवडून आलेला नाही त्यामुळे खा.आढळराव यांनाही पुन्हा निवडून येता येणार नाही याची आम्हीच खबरदारी घेणार आहोतखासदार ढोंगी असून त्यांनी गेल्या दहा वर्षात कसलाही विलास या भागात केलेला नाही  असा घणाघाती हल्ला यावेळी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी उपजिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड यांनी केला. ते पुढे म्हणाले कि,'खासदार आढळराव यांच्या सांगण्यावरून माझी राजकीय हत्या करण्यात आलेली आहे. गेल्या लोकसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी आढळराव यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत आढळराव यांनी माझ्याशी गद्दारी करून माझ्या विरोधात बंडखोर उमेदवार उभा केला. त्यांच्यामुळेच माझा पराभव झाला.  त्यामुळे येत्या निवडणुकीत आढळराव यांना धडा शिकविण्याचा इशारा खांडेभराड यांनी दिला.

------------------
अविनाश दुधवडे,चाकण (९९२२४५७४७५) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)