नव्या रेडीरेकनर दरांनी जमिनी, फ्लॅटला आला सोन्याचा भाव
नव्या रेडीरेकनर दरांनी जमिनी, फ्लॅटला आला सोन्याचा भाव
चाकण परिसरातील चित्र
चाकण -
चाकण शहर आणि लगतच्या भागातील ग्रामीण भागाचे यंदाचे रेडीरेकनरचे दर सामन्यांची चिंता वाढविणारे ठरले आहेत. निवासी सदनिकांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काच्या दरात सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चाकण व लगतच्या विविध प्रकल्पातील निवासी सदनिकेचा दर प्रति चौरस मिटरला १७ हजार २५० रुपयांवरून थेट २५ हजार रुपयांवर जावून पोहचले आहेत. तर चाकण लगतचा भाग असलेल्या आळंदी मध्ये सदनिकेचा दर चक्क २६ हजार ७०० रुपयांवर प्रति चौरस मिटरवर जावून पोहचले आहेत. या आकडेवारीवरून ग्रामीण भागातही सदनिकांच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात चाकण भागात आणि संपूर्ण तालुक्यात झालेले जमीन व्यवहार, निवासी इमारतींच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे विश्लेषण आणि प्रचलित दराचा तुलनात्मक अभ्यास करून नगररचना विभागाकडून २०१४ या वर्षातील रेडीरेकनरचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
काही वर्षांपूर्वी सायंकाळी सातनंतर घराच्या बाहेर जाण्याचे धाडस कुणाचे होत नसे. आता पाच टप्प्यात या संपूर्ण भागात कारखानदारी उभी राहिली आहे. शेतीच्या ठिकाणी प्लॉट पडले आहेत. सिमेंट कॉंक्रीटचे जंगल वाढत असताना जागेलाही सोन्याचे भाव येऊ लागले आहेत. शहराच्या मध्यवस्तीतील खुल्या जागा आता संपल्याचेच चित्र आहे. तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, होऊ घातलेला पुणे-नाशिक लोहमार्ग, बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाहन उद्योगांची पंढरी म्हणून या भागात जागेसाठी वाढती मागणी, यामुळे नावलौकिक मिळविलेल्या चाकण परिसराने जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातही आता झेप घेतली आहे. त्यामुळेच नवीन रेडी रेकनर नुसार मोकळ्या जमिनीचे निवासी सदनिकांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. नव्या बाजारमूल्यानुसार येथील मालमत्तांचे
नवीन वर्षातील बाजार मूल्य दर (रेडी रेकनर) जाहीर झाले आहेत .या महागड्या भागांच्या यादीत चाकण परिसराने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आणखीनच आपले स्थान कायम केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्य मध्यमवर्गीयांचे या दरवाढीमुळे कंबरडंच मोडले आहे. जागेचे भाव वधारल्यामुळे स्टॅम्प ड्यूटी अधिक भरावी लागत असल्याने घर खरेदी करणे अथवा घरासाठी जागा घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. आहे. महागड्या भागाच्या यादीत चाकणही समाविष्ट झाल्याने लगतच्या पिंपरी चिंचवडप्रमाणेच चाकण मध्ये ही सदनिकांच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे स्टॅम्प ड्युटीत वाढ होणार असून त्यामुळे घरांच्या मागणीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता सामान्य नागरिक आणि बांधकाम व्यावसायिक मंडळी व्यक्त करीत आहेत.
नवीन रेडी रेकनरनुसार मोकळ्या जमिनीचे व निवासी सदनिकांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. नव्या बाजारमूल्यानुसार जिल्ह्यातील मालमत्तांचे नवीन वर्षातील बाजार मूल्य दर (रेडी रेकनर) जाहीर झाले आहेत जागेचे भाव वधारल्यामुळे स्टॅम्प ड्यूटी अधिक भरावी लागत आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर अंतर्गत भागात शेतजमिनींना मागील वर्षी २७००रुपये प्रती चौरस मिटर तर चाकण तळेगाव रस्त्यावर औद्योगिक जमिनींना सुमारे ४००० रुपयांच्या पुढे मागील वर्षातील बाजार मूल्य दर (रेडी रेकनर) लागू झाले होते .त्यात यंदा आणखी सरासरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे व निवासी सदनिकेचा दर प्रति चौरस मिटरला १७ हजार २५० रुपयांवरून थेट २५ हजार रुपयांवर जावून पोहचल्याचे चाकण दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक जे.जी.बारमेडा यांच्या कडून सांगण्यात आले.
जमीन खरेदी शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर :
अनेक बडे राजकीय नेते, उद्योजक ,गुंतवणूकदार चाकणला पसंती देत आहेत. येथे मोक्याच्या ठिकाणी अशी मंडळी जमिनी घेत आहेत. जागेत केलेली बचत कधीही फायदेशीर ठरते, असा अनेकांचा अनुभव आल्याने ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे, ते सर्व जागांमध्येच गुंतवणूक करू लागले आहेत. शहरालगतच्या परिसरात शेती विकत घेऊन त्याचे प्लॉट्स पाडून ते विकणाऱ्या प्लॉट व्यवसायिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतीला देखील चांगला भाव मिळू लागला आहे. दहा वर्षांपूर्वी चार दोन लाख रुपये एकर असलेली शेती आता कोटी सव्वा कोटी रुपये एकर विकली जात आहे. त्यामुळे शहरालगतच्या परिसराला देखील भाव आला आहे.त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात मोठी तेजी निर्माण झाली आहे. या उलट मुलींच्या विवाहाचा खर्च, दिवाळी, दसरा, शेतीसाठी लागणारा खर्च, शेतमालालान मिळणारा भाव आदी प्रकारांत नागवला गेलेला सर्वसामान्य शेतकरी जमिनीच्या अशा दरांमुळे साधा दहा बाय दहा फुटांचा प्लॉटही विकत घेऊ शकत नाही. शेतजमीन खरेदी करण्याचा तर तो विचारही करू शकत नाही,अशी विपर्यस्त स्थिती चाकण परिसरात पहावयास मिळत आहे.
अविनाश दुधवडे ,(पत्रकार )चाकण ९९२२४५७४७५ |
------------------------------ ----
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा