२०१५ पर्यंत चाकणमधून होणार हजारो वाहनांचे उत्पादन
वाहनउद्योगाचा चाकणवर फोकस   
देशभर धावणार चाकणच्या प्रकल्पातील वाहने

चाकण:  
कधीकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात चाकण सारख्या भागात आता आलिशान कार उत्पादक कंपन्यांनी जबरदस्त जम बसविला आहे. वाहन उत्पादनाच्या बाबत थेट अमेरिकेच्या डेट्रॉईटशी तुलना होणाऱ्या चाकणचा प्रवास आता वेगाने सुरु आहे. चाकण- तळेगाव  औद्योगिक वसाहतींच्या प्रगतीचा वेग आशिया खंडात सर्वाधिक आहे. देशाचे "ऑटो हबम्हणून प्रसिद्ध झालेल्या या भागात जनरल मोटर्स,   बजाज, टोयोटा, व्होक्सवॅगन इंडिया,मर्सीडीजबेंझ,ह्युंदाई,टाटा,ब्रिजस्टोन,चीनमधील सॅनी ,फॉटॉन आदी अनेक कंपन्या आल्या आहेत.
   चाकण परिसरातील गुंतवणूक वाढतच असून,चीनमधील बड्या सॅनी नंतर आता वाहन उद्योगातील फॉटॉन ने या भागात गुंतवणुकीची मुहूर्त मेढ रोवली आहे.  चाकण च्या प्रकल्पातून चीनच्या गाड्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात धावणार आहेत. महाराष्ट्राच्या वाहन उद्योगाचे अव्वल केंद्र बनण्याची क्षमता चाकणमध्ये आहे.  सध्या चाकणमध्ये फोक्‍सवॅगनबजाज,महिंद्रह्युंडाई,  सॅन हेवि इंडस्ट्रीज अशा एकूण ५० मोठ्या कंपन्या आहेत. याशिवाय इतर  ७०० कंपन्या कार्यरत आहेत. याशिवाय चाकणला लागूनच तळेगाव दाभाडे येथे जनरल मोटर्सने सुमारे बावीसशे कोटींची गुंतवणूक केली आहे.  'मर्सिडीज बेंझने  जम बसवला आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत केवळ दिल्ली आणि मुंबईतच एकवटलेले महागडय़ा लग्झरी मोटारींचे मार्केट आता पुण्यातही हातपाय पसरत आहे. पुण्याच्या रस्त्यांवर सध्या तब्बल ३ ते ४ हजार मर्सिडीज मोटारी धावत असूनदेशातील या कंपनीच्या बाजार हिश्शापैकी ६ ते ८ टक्के वाटा पुण्याचा आहे. विशेष म्हणजे देशातील जवळजवळ सर्व मोटारी पुणे जिल्हातील चाकण च्या प्रकल्पात तयार झाल्या आहेत. मागील आठवड्यात चाकण प्रकल्पात देशातील पन्नास हजाराव्या मर्सिडीज मोटारीचे अनावरण करण्यात आले. मर्सिडीजची 'सी क्लास ग्रँड एडिशनही मोटार या वेळी सादर करण्यात आली. मर्सिडीज 'एस क्लासमधील 'एस- ५००या मोटारीचे उत्पादन मार्च- एप्रिलच्या आसपास चाकणच्याच प्रकल्पात सुरू करणार असल्याचे समजते .  या मोटारीला असलेली मागणी मोठी असून तिच्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या अशा दोन्ही आवृत्त्या येथे  बनवल्या जाणार आहेत. .एस ५००ही मर्सिडीजच्या अत्यंत महागडय़ा मोटारींपैकी एक असून ती देशात बनवली जाणारी पहिली '८ सिलिंडरइंजिन असलेली मोटार असल्याचे सांगण्यात येते.  व्होक्सवॅगन इंडिया कंपनीने सुद्धा चाकण मध्ये स्कोडा फॅबिया पोलो आदी कारचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु केले आहे.
  "फोटॉन ही चीनमधील वाहन उद्योगातील महत्त्वाची कंपनी आहे. चीनच्या फोटॉन या ट्रक व अन्य वाहन उत्पादनांतील आघाडीतील कंपनीने येथे येण्याचे निश्चीत केल्या नंतरच  चाकण औद्योगिक वसाहतीची घोडदौड सुरू असल्याची बाब अधोरेखित झाली होती.  "जीईची सातशे कोटी रुपयांची आणि फोटॉनची सुमारे १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक येथे होत आहे  बांधकाम क्षेत्रास लागणाऱ्या मशिनचे उत्पादन करणारी चीनमधील सॅनी कंपनीने चाकण येथे यापूर्वीच मोठा उत्पादन प्रकल्प उभारला आहे. चीनमधील बांधकाम मशिन क्षेत्रातील कंपनीकडून झालेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक असल्याचे समजते.
  चीनमधील सॅनी चा चाकण येथील उत्पादन प्रकल्प तीन लाख तीस हजार चौरस फुटांचा असूनप्रकल्पासाठी सात कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. प्रकल्पात ट्रकवरील कॉम्पॅक्‍ट पंपकॉंक्रिट मिक्‍सर ट्रककॉंक्रिट बॅचिंग प्लॅंट आणि मोटर ग्रेडरसह क्रेनचे उत्पादन सध्या सुरु आहे. हेवी मशिन्ससाठी कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर आहे.सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतातील कंपनीची उलाढाल २०१५ पर्यंत दीड अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट सॅनी इंडियाने ठेवल्याचे बोलले जाते. हे लक्षात घेता आगामी काळत अंशतः मंदीची स्थिती निवळल्यास येत्या २०१५ मध्ये चाकण च्या  प्रकल्पातून उत्पादित होणारी चीनच्या फोटॉन कंपनीच्या ट्रक व अन्य वाहनांपासून 'एस ५००ही मर्सिडीजची अत्यंत महागडी मोटारही चाकण मध्ये उत्पादित होऊन  देशभरात धावणार असल्याचे स्पष्ट आहे.

-------------------------------------------
 अविनाश दुधवडे  , चाकण. Mobile- 9922457475


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)