जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद
चाकणमधील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद २८६ उत्कृष्ट प्रयोग ; तर २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विज्ञान प्रदर्शनाची पाहणी करताना श्री.प्रतापराव खांडेभराड व सौ.नंदाताई चाकण: पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) व राज्य विज्ञान संस्था , नागपूर आणि पी. के. फाऊंडेशन संचलित पी. के. टेक्निकल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ जानेवारी या कालावधीत चाकण येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद लाभला. या विज्ञान प्रदर्शनात २८६ हून अधिक उत्कृष्ट प्रयोग सदर करण्यात आले होते तर जिल्ह्यातील तब्बल वीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवि ल्याने या प्रदर्शनाला अक्षरशः एखाद्या मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे अनेक मॉडल सादर केले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फेत विज्ञान प्रदर्शन भरविले जाते. हे जिल्हास्तरीय प्रदर्शन प्रथम या भागात घेण्यात आले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील शेकडो विद्