पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आळंदीच्या कीर्तनकार महाराजांवर गुन्हा

इमेज
जीवे मारण्याची धमकी देत युवतीवर बलात्कार आळंदीच्या कीर्तनकार महाराजांवर गुन्हा चाकण:    आळंदी  (ता.खेड , जि.पुणे ) येथील  एका युवकाने ओळखीचा फायदा घेवून २२ वर्षीय  तरुणीवर  गेल्या काही दिवसांपासून पासून वेळोवेळी बदनामीची व जीवे मारण्याची भीती दाखवीत ह.भ.प शेणगावकर महाराजांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . याबाबत चाकण पोलिसात आज (दि.३०)  रात्री उशिरा संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      ह.भ.प शिवदास शेणगावकर ( रा. आळंदी , ता.खेड  जि.पुणे ) असे या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या महाराजांचे  नाव आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधित नराधमाने चाकण मधील एकतानगर भागात राहणाऱ्या या युवतीवर गेल्या काही महिन्यापासून  आळंदी   ,  यवतमाळ येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला.  सततच्या या प्रकारांना कंटाळून अखेर  पीडित युवतीने चाकण पोलिसात तक्रार दिली. पोलिसानी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.    ------------------------------ ----  अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

प्रलंबित प्रश्नांसाठी हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार : आमदार गोरे

इमेज
प्रलंबित प्रश्नांसाठी हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार  आमदार सुरेश गोरे यांचे प्रतिपादन चाकण :   खेड तालुक्यातील राजगुरुनगर-चाकण-आळंदी ही महत्वाची शहरे आहेत  ,  या शहरातील काही धोरणात्मक अडचणी सोडवण्यासाठी व तालुक्यातील पुनर्वसन आणि अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी आपल्याच विचारांच्या राज्य सरकारकडे हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा केला जाईल ,  अशी ग्वाही खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी दिली. चाकण ग्रामस्थ ,  चाकण पतसंस्था व विविध संघटना यांच्या वतीने आमदार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.  तालुक्यातील ही महत्वाची शहरे आणि दुर्गम भाग सुंदर बनवायचा आहे. त्यासाठी कोणती विकासकामे पहिल्या टप्प्यात करावीत ,  कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे याबाबतचे नियोजन केले जात आहे. आता खेडच्या जनतेने हक्काचा आमदार निवडून दिलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सर्वाना सोबत घेवून गावागावातील नागरिकांच्या समन्वयातून विकासात्मक कामे केली जातील. येथील समस्या मंत्रालयीन स्तरावर पोहचल्याच नाहीत त्या आता सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सोडविण्याचा प्रयत्न असणार आहे. हिवाळी अधिवेशनात यातील समस

चाकण ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत सुरु

इमेज
चाकण ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत सुरु पहिल्याच दिवशी मोठ्या रांगा  चाकण:     चाकण येथील ग्रामीण रुग्णालय आज (दि.८) पासून  नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.  पुढील कामासाठी निधीच्या तरतुदी अभावी  ग्राऊंड फ्लोअर वरच अडकलेली ही नवीन वास्तू चाकण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने मागील आठवड्यात ताब्यात घेण्यात आली होती. त्या नंतर आज पासून   रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्येच सर्व कामकाज सुरु करण्यात आले आहे. सध्या या नवीन इमारतीमध्ये पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.    सध्या या नवीन रुग्णालयात ९ रुग्णांसाठी खाटांची सोय असून येथे तीस खाटांची मंजुरी असतानाही इमारतीच्या वरच्या मजल्याचे सहा हजार स्क्वेअर फुटांचे काम झालेले नसल्याने काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.  येथे आणखी सोयीसुविधा मिळाव्यात अशी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे. येथे एक वैद्यकीय अधीक्षक व तीन डॉक्‍टरांची नियुक्‍ती आहे. मात्र एक जागा रिक्त असून डॉक्टरांची संख्या मर्यादित असल्याने मोजक्याच डॉक्‍टरांवर दिवस- रात्र रुग्णांच्या तपासणीची जबाबदारी येते. पुणे -नाशिक राष्

सलाम तुला मलाला ...

इमेज
सलाम तुला मलाला   ...   मलाला युसूफझाई पाकिस्तानात खैबर पख्तुनवाला हा जो आदिवासीबहुल प्रांत आहे तिथे अजून सात लाख मुलांनी प्राथमिक शाळेचे तोंडही पाहिलेले नाही आणि त्यातील सहा लाख मुली आहेत. मुलांच्या तुलनेत त्यांना शिक्षण घेण्याची संधी शून्य आहे. याच प्रांतात शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या मलाला युसूफझाई या मुलीवर ती तिच्या मैत्रिणींबरोबर शाळेत जात असताना तालिबान्यांनी हल्ला केला, त्यात ती सुदैवाने वाचली. या ठिणगीला जन्म देणारा वणवा म्हणजे तिचे वडील झियाउद्दीन युसूफझाई. त्यांच्यामुळेच मलाला या लहानग्या मुलीत शिक्षणाची आवड निर्माण झाली. एकीकडे मलाला हिची शिफारस शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी होत असतानाच झियाउद्दीन यांची नेमणूक संयुक्त राष्ट्रांनी जागतिक शिक्षणाचा खास सल्लागार म्हणून केली आहे. याच विभागात संयुक्त राष्ट्रांचे दूत असलेले ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी केलेली ही निवड निश्चितच कल्पक आहे. झियाउद्दीन हे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि विशेष म्हणजे तालिबानच्या धमक्यांना न जुमानता लहान वयात मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या मलालासारख्या धीट व शूर मुलीचे पिता आह

विजय लॉजिस्टीक कारखान्याला भीषण आग

इमेज
विजय लॉजिस्टीक कारखान्याला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश ११ एकरातील संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी कोट्यावधी रुपयांचे नुकसान चाकण जवळील विजय लॉजिस्टीक या कारखान्याला लागलेली भीषण आग ( फोटो : अविनाश लक्ष्मण दुधवडे  ,  चाकण ) चाकण :  पुणे-नाशिक महामार्गावरील भाम (ता.खेड.जि पुणे ) हद्दीतील विजय लॉजिस्टीक या टाटा मोटर्सशी संबंधित गोदामाला  आज (दि.४ ) रात्री आठ  वाजनेचे सुमारास भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग विझविण्यासाठी चार अग्निबंब व अनेक  पाण्याच्या टॅँकरच्या  सहाय्याने अग्निशामान दलाचे जवान प्रयत्न करीत होते. या दुर्घटनेत कारखान्याच्या सुमारे अकरा एकर जागेतील इमारतीसह मोठी दोन शॉप ,  कच्चा-पक्का माल  ,  यंत्र सामुग्री  ,  कार्यालय , फर्निचर संपूर्णपणे आगीत स्वाहा झाल्याने कोट्यावधी  रुपयांचे नुकसान झाले आहे.  आगीतील नुकसानीचा हा आकडा कोट्यावधी रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.    आज (दि.४) रात्री आठ वाजनेचे सुमारास विजय लॉजिस्टीक कंपनीच्या  शॉप मध्ये आग लागल्याचे कंपनीतील कामगार  , सुरक्षारक्षक व परिसरा

टोमॅटो,कोबी,वांगी,पालक,आदी भाज्यांचे भाव गडगडले

इमेज
टोमॅटो , कोबी , वांगी , पालक , आदी भाज्यांचे भाव गडगडले सणामुळे व्यापाऱ्यांची बाजाराकडे पाठ  ;  मालाला उठावच नाही भाज्या फेकून देण्याची वेळ  बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या फळभाज्या व पालेभाज्यांचा उत्पादन खर्चही भरून येवू न शकल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावरच टोमॅटो ,वांगी   व भाज्या फेकून दिल्या होत्या. (छाया:अविनाश दुधवडे , चाकण) चाकण:वार्ताहर   मागील पंधरवड्यात भाज्यांचे भाव गगणाला भिडलेले असताना भाजीपाला खरेदी करणे म्हणजे सर्व सामान्यांची कसोटी लागत होती.  मात्र आज (दि.२३) अचानक आवक वाढल्याने व दोन दिवसांपासून सणामुळे बाजारात व्यापारी वर्गाने बाजाराकडे पाठ फिरवल्याने शेती मालाला उठावच मिळाला नाही ,  आणि टोमॅटो , कोबी  ,  वांगी  , पालक  , आदी भाज्यांचे भाव अचानक गडगडले. टोमॅटो , कोबी  यांची  एक रुपया किलो प्रमाणेही  विक्री होत  नव्हती . भोपळा , वांगी ,  आदी फळभाज्यांची अवस्थाही अशीच झाली. काढणी खर्चदेखील वसूल होत नसल्याचे पाहून चाकण येथील  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात शेतकऱ्यांवर पालेभाज्यांच्या हजारो जुड्या व टोमॅटो  भोपळा  , वांगी रस्त्यावर फेकून देण्याची

दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध!!!

इमेज
दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध!!! विविध संघटनांकडून आंदोलनाचा इशारा.... चाकण:  अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात जवखेडे खालसा गावामध्ये दलित कुटूंबातील युवक व त्याचे आई-वडील अशा तिघांची निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या तिहेरी दलित हत्याकांडाचा चाकण सह तालुक्यातील दलित संघटनांनी तीव्र निषेध केला असून राज्यात दलित समाज दहशतीत वावरत असून पोलिसांनी आरोपींना अटक करुन जाधव कुटूंबियांना न्याय प्रदान करावा ,  अशी जोरदार मागणी केली आहे.  नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव ,  तालुकाध्यक्ष संतोष जाधव ,  शहराध्यक्ष अशोक गोतारणे ,  राहुल गोतारणे,   सतीश आगळे ,  नितीन जगताप ,  अक्षय घोगरे ,  अभिजित घोगरे ,  महेंद्र दुधवडे ,  यांनी या संदर्भात राज्यभरातील विभागीय आयुक्त कार्यालयांकडे निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले असून  या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा संघटनेतर्फेही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असू

दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री हवा आहे का?

इमेज
दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री हवा आहे का ?   उद्धव  ठाकरे  यांचा सवाल ... शिवसेनेची चाकणला विराट सभा चाकण (ता.खेड , जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना उद्धव  ठाकरे   (छायाचित्र :अविनाश दुधवडे , चाकण) चाकण:वार्ताहर -   शहेन शहा असो की बाद शहा ,  दिल्लीपुढे मान झुकविणार नाही हा शिवरायांचा बाणा ,  महाराष्ट्र झुकेल तो फक्त शिवराय  ,  जिजाऊ आणि जनते समोर   ,  केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे हे बोलण्यासाठी ठीक आहे.  दिल्ली हमारी ,  राज्यातही आम्हीच. अरे तुमचा मुख्यमंत्री कोण ?  कोण आहे तुमच्याकडे चेहरा  ?  दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे का  ?  असा परखड सवाल उपस्थित करीत राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे  यांनी चाकण येथे विराट जाहीर सभेत व्यक्त केला.     खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ चाकण (ता.खेड , जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात आज (दि.९ ) आयोजित वि

नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा परिचय

इमेज
नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा परिचय चाकण:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शब्द बारामतीप्रमाणेच एकमेव खेड तालुक्याने कधीही पडू दिला नाही . त्यामुळे येथे नेहमीच पवारांच्या विचारांचा आमदार निवडून गेल्याचा मागील अनेक वर्षांचा इतिहास आणि तालुक्यातील त्यांची मक्तेदारी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी मोडीत काढली. आणि त्यांनी १ लाख ३ हजार २०७ मतांसह राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांच्यावर ३२ हजार ७१८ मतांची आघाडी घेत मोठा विजय संपादन केला. त्यामुळे आपणच खेड तालुक्याचे बाजीगर असल्याचे गोरे यांनी दाखवून दिले आहे. नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेश नामदेव गोरे यांचा जन्म २७ डिसेंबर १९६३ ला चाकण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चाकणच्या शिवाजी विद्यामंदिरात पूर्ण झाले. त्यांनी बी.कॉम ची पदवी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून घेतली असून ,  पुण्याच्याच सिंबॉयसिस येथून डी.टी.एल. (डिप्लोमा इन टॅक्सेशन लाॅ) व डी.बी.एम पदवी संपादन केली आहे. १९९८ साली त्यांची सर्वात प्रथम चाकण विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर संचालक व अध्यक्ष म्हणूनही निवड झाली. २००२ मध्ये सर्वात प्

तालुक्यातील समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य

इमेज
तालुक्यातील समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य नवनिर्वाचित आमदार गोरेंच्या समोर अनेक आव्हाने चाकण:      खेड तालुक्यातील प्रचंड टोकाची विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी एकदाची संपली आहे. तालुक्यातील तमाम जनतेने पहिल्यांदाच सुरेशभाऊ गोरे यांच्या रूपाने  एकूण मतदानाच्या ५२ टक्क्यापेक्षा अधिक मते म्हणजे तब्बल १ लाख ३ हजार २०७ मते पदरात टाकीत  शिवसेनेला संधी दिली आहे. सामान्यांना हवा असणारा आश्वासक विकास व भयमुक्त तालुका या  सुरेशभाऊ  गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आवाहनाला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेने जबरदस्त प्रतिसाद दिला.   नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांना दोनदा जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून असलेला अनुभव दांडगा यामुळे तालुक्यातील समस्यांशी ते अवगत आहेत . मात्र तरीही तालुक्याच्या संपूर्ण गावागावाची व संबंधित नागरिकांना अपेक्षित कामकाजाची माहिती होण्यास काही कालावधी नक्कीच लाग णार आहे  .      खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे विकासाच्या बाबतीत कोसो दुर आहे त . तालुक्यातील अनेक गावांना विकासाच्या वाटेवर चालण्यासही अजुन बराच काळ ला